OBC Reservasion | रोहिणी खडसे, एकनाथ खडसे यांची सोशल मीडियावर बदनामी, एकावर FIR दाखल; जाणून घ्या

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन (policenama online) – ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservasion) मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या कन्या अ‍ॅड. रोहिणी खडसेंनी भाजवर टीका केली होती. त्यामुळे अ‍ॅड. रोहिणी खडसे आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Adv. Rohini Khadse and former minister Eknath Khadse) यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह ट्वीट करून बदनामी करणा-या व्यक्तीच्या विरोधात शनिवारी (दि. 26) सायबर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. OBC Reservation rohini and eknath khadse defamed social media filed crime

या प्रकरणी अशोक सिताराम लाडवंजारी (वय 48, रा.मेहरुण, जळगाव) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा (FIR) दाखल केला आहे. भाजपच्या (BJP) ओबीसी आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ॲड. रोहिणी खडसे यांनी ट्विट करून भाजपला ओबीसीचा कळवळा कधीपासून आला?, ओबीसी नेत्याचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता? आता गळा आवळण्यात काय अर्थ अशी टीका केली होती. त्यावर ‘सपोर्ट युथ नगमा-216 या नावाच्या युजरने ॲड. रोहीणी आणि एकनाथराव खडसे यांच्याविषयी शिवीगाळ करुन आक्षेपार्ह टीका केली. सोशल मीडियावर त्याची चर्चा झाली. त्यामुळे खडसे परिवाराची बदनामी झाली म्हणून अशोक लाडवंजारी यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक बळीराम हिरे (Police Inspector Baliram Hiray) तपास करीत आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update 

Web Title :- obc reservation rohini and eknath khadse defamed social media filed crime

हे देखील वाचा

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांच्या ‘या’ 7 मागण्या होणार पुर्ण? महागाई भत्त्याचा देखील समावेश, जाणून घ्या

Pune Curfew | राज्यात डेल्टा+ व्हेरिएंटनं प्रचंड खळबळ ! पुण्यात सायंकाळी 5 नंतर संचारबंदी, जाणून घ्या काय सुरू अन् काय बंद

Delta Plus variant । ‘डेल्टा व्हेरिएंट’ कोरोनाचा सर्वाधिक संक्रमण होणारा प्रकार; WHO ने दिला इशारा (व्हिडीओ)