न्याय हक्कासाठी 3 नोव्हेंबरला OBC धडकणार महाराष्ट्रातील विविध तहसील कार्यालयांवर

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन – ओबीसी समाजाची 2021 ला ओबीसी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आशा विविध प्रलंबित मागण्यांसाठी लक्षवेधी आंदोलने एकाच वेली राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 3 नोव्हेंबर रोजी 11 वाजता महाराष्ट्रातील सर्वच तालुक्यातील तहसीलदार कार्यालया समोर निदर्शने करून तहसीलदार यांच्या मार्फत मा मुख्यमंत्री मोहदया पर्यंत निवेदन पोहचविण्यासाठी ओबीसी समितीने ठरविले आहे.

राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुरबाड कुणबी समाज हॉल येथे ओबीसी जनगणना झाली पाहिजे प्रलंबित मागण्या पूर्ण होण्यासाठी दि 3 नोव्हेंबर रोजी जनआंदोलनाची पूर्व बैठक घेऊन समस्त ओबीसी समाजाला अहवान करण्यात आले. ओबीसी संघर्ष समन्वय समिती यांच्या वतीने मुरबाड तालुक्यातील ओबीसी समाजाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी तहसीलदार मार्फत मा मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्या संदर्भात सहविचार नियोजन सभा कुणबी भवन येथे आयोजन केले होते.

या वेळी कुणबी समाज उन्नती मंडळ मुरबाड अध्यक्ष शांताराम बांगर, माजी अध्यक्ष गणपत विषे तात्या, ओबीसी संघर्ष समितीचे जिल्हा प्रमुख दत्ता पाटील, ओबीसी संघर्ष समिती ठाणे सचिव प्रमोद जाधव, उपाध्यक्ष आत्माराम सासे, सरचिटणीस पी एस पवार, पंचायत समिती सभापती श्रीकांत धुमाळ, जिल्हापरिषद सदस्य रेखा कंटे, तालुका ओबीसी संघर्ष समिती संघटक उमेश पाटील, प्राथमिक संघटना जिल्हा अध्यक्ष भगवान भगत, मनोहर इसामे सरचिटणीस, केतना ठाकरे सरचिटणीस, अपर्णा खाडे समाजसेवीका, मधुकर अण्णा, पांडुरंग कोर, मोहन भावर्ते, धनाजी, दळवी, अनिल देसले,द शरथ पष्टे, सुवर्णा ठाकरे, तालुका सदस्य साधना मोरे, राजश्री घुडे, यासह तालुक्यातील जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.