Obesity | लठ्ठपणामुळे ‘या’ आजारांचा धोका जास्त वाढू शकतो; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – लठ्ठपणा (Obesity) हा केवळ एकच आजार नाही. तर, लठ्ठपणा वाढला की त्याबरोबर इतर काही आजार निर्माण होतात आणि नंतर जाड व्यक्ती बारीक झाली तरी राहतातच. थोडक्यात म्हणजे जडतात. आता तक विकार नेमके कोणते ते पाहू या (Obesity).

 

रक्तदाब (Blood Pressure) –
आपल्या रक्तवाहिन्यांद्वारे (मोठ्या रक्तवाहिन्या) रक्त संपूर्ण शरीरात आपल्या हृदयाद्वारे पंप केले जाते. मात्र लठ्ठपणामुळे जर त्यावरील दबाव वाढला तर तो आपल्या रक्तवाहिन्या आणि हृदयावरही येतो. त्यामुळे आपल्याला हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक किंवा मूत्रपिंडाचा आजार (Heart Attack, Stroke Or Kidney Disease) होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते.

 

उच्च कोलेस्ट्रॉल पातळी (High Cholesterol Level) –
जास्त वजन असल्याने खराब कोलेस्टेरॉलची पातळी (Bad Cholesterol Level) (एलडीएल) वाढते. आणि कोलेस्टेरॉलची पातळी (एचडीएल) चांगली होते. त्यामुळे तुमचं वजन वाढत. वजन वाढणे (Obesity) म्हणजे शरीरात जास्त चरबी वाढणे, ज्यासाठी पॅकेट्स, प्रक्रिया केलेल्या वस्तू आणि जंक फूड जबाबदार असतात. कारण, त्यांच्यात सॅच्युरेटेड फॅट आणि ट्रान्स फॅट (Saturated Fat And Trans Fat) जास्त असतात. शरीरातील ही दोन कारणे, विशेषत: कमी घनतेचे कोलेस्ट्रॉल (एलडीएल) किंवा खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवतात.

स्लीप एपनिया (Sleep Apnea) –
ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया (ओएसए) हा झोपेशी संबंधित श्वासोच्छवासाचा विकार आहे. यामुळे झोपताना श्वास वारंवार बंद पडतो आणि मग हालचाल होते. या आजाराशी झुंजणार्‍या व्यक्तीच्या झोपेत श्वास थांबतो आणि त्याला कळतही नाही. झोपेत दम लागणे ही समस्या काही सेकंदापासून मिनिटापर्यंत टिकू शकते. स्लीप एपनियाचे बरेच प्रकार आहेत आणि अवरोधक स्लीप एपनिया त्यापैकी एक आहे.

 

सांधेदुखी (Joint Pain) –
लठ्ठपणामुळे पाय शरीराचे सर्व वजन उचलू शकत नाहीत, त्यामुळे गुडघ्यांच्या सांध्यामध्ये तीव्र वेदना होतात. यामुळे पीडित व्यक्तीला दोन पावलं चालणंही खूप कठीण जातं. यामुळेच सांधेदुखी होते. असा विश्वास आहे की लठ्ठ लोकांमध्ये चरबीयुक्त ऊतक लेप्टिन नावाचा संप्रेरक तयार करतात, ज्याचा परिणाम पाचनप्रक्रियेवर होतो. त्यामुळे सांधेदुखी होते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Advt.

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Obesity | obesity can increase the risk of these diseases too much

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | धक्कादायक ! 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन दोघा नराधमानी केला बलात्कार, चिंचवडमधील घटना

 

Multibagger Stock | ‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदार बनले मालामाल; एका महिन्यात दुप्पट पैसे, जाणून घ्या

 

Pune Crime | पुणे महापालिकेच्या टॅक्सची बनावट पावती देऊन साडेतीन लाखांची फसवणूक; महिलेसह दोघांविरूध्द कोंढव्यात गुन्हा