Obesity Problems | शास्त्रज्ञांचा इशारा : 18-24 वर्षाच्या तरूणांमध्ये ‘या’ समस्येचा सर्वात जास्त धोका, होऊ शकतात अनेक आजार; जाणून घ्या

नवी दिल्ली : Obesity Problems | एका संशोधनातून शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की, येत्या काही वर्षात इतर वयोगटाच्या तुलनेत 18 ते 24 वर्षाच्या तरूणांमध्ये लठ्ठपणाची जोखीम सर्वात जास्त असू शकते (The highest risk of obesity problems in 18-24 year olds). युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (यूसीएल), केंब्रिज विद्यापीठ आणि बर्लिन इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थ अ‍ॅट चॅरिटी-विद्यापीठाच्या संशोधकांच्या नेतृत्वात हे संशोधन करण्यात आले. द लॅन्सेट डायबिटीज अँड एंडोक्रिनोलॉजीमध्ये हे संशोधन प्रकाशित झाले असून गंभीर इशारा देण्यात आला आहे.

कोविड काळात वाढला धोका

संशोधनाचे सह-वरिष्ठ लेखक हॅरी हेमिंग्वे म्हणतात, कोविड-19 च्या काळात वजनाशी संबंधित समस्यांची गणना करणे महत्वाचे वाटते. कोरोना महामारीने अप्रत्यक्ष प्रकारे ही समस्या खुप मोठ्या प्रमाणात वाढवली आहे.

संशोधनात काय आढळले?

– येत्या 10 वर्षात 65-74 वयोगटाच्या तुलनेत 18-24 वर्षाच्या लोक उच्च बीएमआय श्रेणीत जाण्याची जोखीम चारपट जास्त असेल.

– आरोग्य तज्ज्ञांना वाढत्या वजनाच्या धोक्यासाठी अनेक प्रकारच्या सामाजिक कारकांसह, खाणे-पिणे आणि जीवनशैलीत गडबड जबाबदार आढळून आली आहे.

संशोधनाचे प्रमुख लेखक डॉ. मायकल कॅट्सॉलिस (यूसीएल इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थ इम्फॉर्मेटिक्स) म्हणतात की, आमच्या निष्कर्षात स्पष्ट दिसते की, बीएमआयमध्ये होणार्‍या परिवर्तनासाठी वयाला सर्वात महत्वाचे कारक मानले गेले जाऊ शकते.

वृद्ध लोकांच्या तुलनेत 18 ते 24 वर्ष वयाच्या तरूणांमध्ये बीएमआयची जोखीम जास्त असते. तसेच 35 ते
54 वर्ष वयाचे लोक लठ्ठपणाला बळी पडले आहेत, त्यांना वजन कमी करण्यासाठी इतर प्रौढांच्या तुलनेत जास्त समस्या होऊ शकते.

हे देखील वाचा

Pune ACP Transfer | सहायक पोलिस आयुक्त सुनिल पवार यांची सिंहगड रोड विभागात नियुक्ती

Pune Corporation |  पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा ऑफलाईन घेण्याचे प्रधान सचिवांचे पालिका आयुक्तांना आदेश

बदलला LPG घरगुती गॅस सिलेंडरशी संबंधित ‘हा’ नियम! बुकिंगचे टेन्शन झाले दूर, जाणून घ्या

Pune Crime | भाजपचे नगरसेवक धिरज घाटे यांच्या हत्येचा कट; एका राजकीय पक्षाशी संबंधित तिघांवर गुन्हा, पोलिसांनी घेतले ताब्यात

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Obesity Problems | adults between the age of 18 to 24 are at the highest risk of becoming overweight says study

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update