Objectionable Picture | वायरल झाले PM Modi, CM Yogi आणि Amit Shah यांचे आक्षेपार्ह छायाचित्र, आरोपींच्या शोधात पोलीस

प्रयागराज : वृत्तसंस्था – Objectionable Picture | उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये मागील शुक्रवारी एक असे आक्षेपार्ह छायाचित्र (Objectionable Picture) वायरल झाले, ज्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. येथे एका युवकाने पीएम मोदी, सीएम योगी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या चेहर्‍यावर फुलीचे निशाण करून फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर वायरल केले. प्रकरण लक्षात येताच पोलिसांनी या तरूणाचा शोध सुरू केला. सध्या, सायबर सेल युवकाच्या आयडीवरून त्याची माहिती मिळवत आहे. या पाठीमागे एखादा मोठा कट असू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

काय होते वायरल छायाचित्रात
वायरल फोटोमध्ये एक मुलगा हातात पोस्टर घेऊन उभा आहे. या पोस्टरमध्ये अनेक फोटो आहेत. PM Modi, CM Yogi, गृहमंत्री Amit Shah आणि हिटरलसह दोन आणखी लोकांची सुद्धा छायाचित्रे लावली आहे आणि सर्वांच्यावर फुलीची निशाणी केली आहे. हे छायाचित्र शुक्रवारी वायरल झाले. पोलीस तपासात समजले की, फोटो शेयर करणार्‍या अकाऊंटचे नाव हसन चकिया आहे.

सराईत गुन्हेगार आहे हसन चकिया
हसन चकिया एक सराईत गुन्हेगार आहे. काही दिवसापूर्वी त्याने घरावर चढून फायरिंग केल्याच्या प्रकरणात सरेंडर केले होते आणि जेलमध्ये गेला होता. इतकेच नव्हे, तर नुकत्याच झालेल्या हाणामारीत त्याने पोलिसांवर बॉम्बगोळ्याने हल्ला केला होता. या प्रकरणात 3 लोक जखमी झाले होते. तसेच चकिया प्रयागराजच्या खुल्दाबाद आणि धूमनगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणारा एक मोहल्ला आहे. हा माजी खासदार अतीक अहमद यांचा मतदारसंघ आहे. सध्या, पोलिसांनी फेसबुक यूजर नेमच्या आधारावर केस दाखल केली आहे.

Web Titel :- objectionable picture of pm modi cm yogi and amit shah viral police in search of accused

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Linking Vaccine certificate to Passport | व्हॅक्सीन सर्टिफिकेट पासपोर्टशी ‘या’ पध्दतीनं लिंक करा; जाणून घ्या प्रक्रिया अन् महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे

Pune Crime | परमीटरुममध्ये जाऊन हप्ता मागणार्‍या तोतया महिला पत्रकारासह दोघांना अटक

NPS New Rules | सरकारच्या ‘या’ स्कीममधून तुम्हाला मिळेल 5 लाख रूपयापर्यंतची रक्कम, जाणून घ्या काय आहे नवीन नियम?