खळबळजनक! विकीपिडीयावर शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह मजकूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – विकीपीडीया म्हणजे माहितीचा खजिना म्हणून ओळखले जाते. परंतु, याच विकीपिडीयावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची माहिती देताना ‘Sharad pwar is most corrupt Indian politician’ असा मजकूर अपलोड करण्यात आला आहे. यापुर्वी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पक्षाबद्दलची माहिती रोज बदलली जात होती. ही माहिती कुणीतरी खोडसाळपणे विकीपीडीयावर अपलोड केल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे विकीपिडीयाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

विकीपीडीया हा जगभरातील माहितीचे भांडार म्हणून ओळखले जाते. विकीपिडीयावर जगभरातील माहिती सामान्य नागरिकही भरू शकतो. एखादी व्यक्ती, स्थळ, आणि इतर अनेक बाबींबद्दल आपल्याला माहिती असल्यास ती तेथे जगाला आपण सांगू शकतो. परंतु, या माहितीच्या सत्यतेबाबत विकीपिडीयावर नेहमीच संशय घेतला जातो. य़ापुर्वी विकीपिडीयावर अशाच प्रकारे अनेक दिग्गज नेते, ठिकाणं यांच्याबद्दल आक्षेपार्ह माहिती देण्यात आलेली होती. तर आता शरद पवार यांची माहिती देताना हा आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला आहे. यापुर्वी विजयसिंह मोहिते पाटील यांच्याही पक्षाबद्दलची माहिती रोज बदलली जात होती. त्यासोबतच गोव्याचे मुख्यमंत्री व माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून काही वेळातच प्रमोद सावंत यांचे नाव दाखवले जात होते. त्यानंतर आता शरद पवार यांच्याबद्दल ही खोडसाळ माहिती देण्यात आली आहे. मात्र, ही माहिती एका बनावट खात्यावरून दिली असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.

विकीपिडीयावर अशा प्रकारे कोणीही माहिती भरू शकते. ती अपडेट करू शकते. परंतु तिची पडताळणी केली जात नाही. विकीपिडीयाकडून ती ओपन डोमेनमध्ये ठेवून पडताळणी केली जाते. त्यामुळे तिच्या विश्वासार्हतेवर प्रश्न आधीपासूनच आहे. परंतु देशातील नेत्यांबद्दल अशी माहिती विकीपिडीयावर अपडेट होणे ही चिंतेची बाब आहे.