Indapur News : अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे; 5 जणांवर FIR दाखल

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन – आजीकडे वास्तव्यास असलेल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीशी घरातील नातेवाईकांच्या संगनमताने अल्शील चाळे करीत छेडछाड केल्याचा प्रकार इंदापूर शहरात घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह पाच जणांविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी शिवम संतोष क्षीरसागर, संतोष मोहन क्षीरसागर, सारिका संतोष क्षीरसागर (सर्व रा. अंबीकानगर, देशपांडे वाड्यासमोर, इंदापूर, जि. पुणे) व मंगल मोहन क्षीरसागर (रा. जिती, ता. करमाळा, जि. सोलापूर), शामल विनायक जाधव (रा. कात्रज, भारती विद्यापीठ पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. यातील दोघांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. 2 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.

मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, अल्पवयीन मुलगी ही तीच्या आजीकडे इंदापूर येथे रहात आहे. तर फिर्यादी या बारामती येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या पतीचे निधन झाले आहे. तर त्यांच्या सासुबाई या वयस्कर व एकट्याच आहेत. त्या नातीसोबत इंदापूर येथे राहत आहेत. तसेच फिर्यादीच्या सासूबाई या अनेकदा औषधोपचारासाठी व कार्यक्रमानिमीत्त नातेवाईकाकडे वारंवार बाहेरगावी जातात. यावेळी पीडीत मुलगी घरी एकटीच असते. फिर्यादीच्या सासुबाईच्या घराशेजारी त्यांचे नातेवाईक राहण्यास आहेत. त्याच्याच नात्यातील शिवमने नात्यातील ओळखीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीशी जवळीक केली. तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी घरातील नातेवाईकांच्या संगनमताने अल्शील चाळे केले, तिची वारंवार छेडछाड केली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे करीत आहेत.