Video : ‘सैन्य दिवसा’च्या निमित्तानं अक्षय कुमार अन् क्रिती सनॉन यांनी घेतली जैसलमेरमधील जवानांची भेट ! ‘खिलाडी’ खेळाला व्हॉलीबॉल

पोलीसनामा ऑनलाईन टीम : आज सैन्य दिवस आहे. बॉलिवूड स्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अ‍ॅक्ट्रेस क्रिती सनॉन (Kriti Sanon) यांनी या निमित्तानं पश्चिम राजस्थानमधील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय बॉर्डर येथील जैसलमेरमधील जवानांची भेट घेतली. या जवानांनीही अक्षय आणि क्रिती यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. यावेळी अक्षयनं त्यांच्याशी बातचित केली. या दिवसाचं औचित्य साधून त्यानं विजय रण फॉर सोल्जर मॅरेथॉनला हिरवा कंदील दाखवला.

सैन्य दिवसाच्या निमित्तानं सकाळी जैसलमेरमधील आर्मी स्टेशनच्या सगत सिंग स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या विजय रण फॉर सोल्ज मॅरेथॉनला अक्षय कुमार आणि क्रिती सनॉन यांनी हिरवा कंदिल दिला. इतकंच नाही तर अक्षयनं जवानांसोबत व्हॉलीबॉलचाही आनंद घेतला आणि त्यांना प्रोत्साहन दिलं.

यावेळी त्याठिकाणी सैन्याचे अधिकारी आणि मोठ्या संख्येनं जवान उपस्थित होते. सैन्यातील जवान सिनेइंडस्ट्रीतील स्टार्सना पाहण्यासाठी उत्सुक दिसले. गोल्डन सिटी जैसलमेरमध्ये अक्षय आणि क्रिती हे सध्या बच्चन पांडे सिनेमाची शुटींग करत आहेत. गेल्या 10 दिवसांची सिनेमाची शुटींग सुरू आहे. या दोघांसोबत अभिनेता अरशद वारसी हाही तिथंच आहे.

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याचा सूर्यवंशी हा आगामी सिनेमा 24 मार्च 2020 रोजी रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळं सिनेमाची रिलीज डेट टाळण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच तो लक्ष्मी सिनेमात दिसला आहे. यानंतर आता तो पृथ्वीराज, बेल बॉटम आणि अतरंगी रे, बच्चन पांडे, रक्षाबंधन अशा काही सिनेमातही काम करताना दिसणार आहे. त्याच्याकडे राम सेतु हाही सिनेमा आहे.