राष्ट्रवादीचे डाॅ.अमोल कोल्हेंकडून पराभूत झालेल्या शिवाजीराव अढळराव पाटलांना शिवसेनेकडून ‘हे’ मोठे पद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचा ५३ वा वर्धापनदिन षण्मुखानंद सभागृहात होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वर्धापन दिनाला उपस्थित राहिले आहेत. या कार्य़क्रमामध्ये नवनिर्वाचीत खासदरांचा सत्कार करण्यात आला. तसेच शिरूर मतदारसंघातून पराभूत झालेले शिवाजी आढळराव पाटील यांना शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. आढळराव पाटील यांच्या पराभावनंतर त्यांचे एकप्रकारे पुनर्वसन केल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्य़क्रमाला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी उपस्थित आहेत.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिरुर मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील यांचा शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रस पक्षात आलेले अमोल कोल्हे यांच्याकडून पराभवाचा सामाना करावा लागला आहे. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी आढळराव पाटील हे मंत्री पदाचे दावेदार होते.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक