पद्मसिंह पाटील यांनी माझ्या हत्येची सुपारी दिली होती ; अण्णा हजारेंची CBI कोर्टात साक्ष

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पद्मसिंह पाटील यांनी माझ्या हत्येची सुपारी दिली होती अशी साक्ष ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी मुंबई सत्र न्यायालयातील सीबीआय कोर्टात दिली आहे. पद्मसिंह पाटील हे शरद पवारांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे माझ्या तक्रारीची कुणीही दखल घेत नाही. मला दिलेल्या धमकीबाबत मी मुख्यमंत्र्यांपासून ते पंतप्रधानांपर्यंत दाद मागितली असल्याचे अण्णा हजारेंनी न्यायालयात सांगितले.

३ जून २००६ रोजी नवी मुंबईतील कळंबोली परिसरात पवनराजे निंबाळकर यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर राजकीय वैमनस्यातून पवनराजे निंबाळकर यांच्या खूनासाठी ३० लाख रुपयाची सुपारी दिल्याचा आरोप आहे. पवनाराजे निंबाळकर हत्ये प्रकरणात आण्णा हजारे सरकारी साक्षीदार म्हणून मुंबई सत्र न्यायालयातील सीबीआय कोर्टात दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी पद्मसिंह पाटील यांनी माझ्या हत्येची सुपारी दिली होती, असे सांगितले.

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकणात आज आण्णा हजारे यांची साक्ष तसेच उलटतपासणी झाली. माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात सरकाने चौकशी करावी ही मागणी आपण वेगवेगळ्या पातळीवरून केली होती, असे आण्णा हजारे म्हणाले. मात्र पाटील यांनी आपल्याविरुद्ध आब्रुनुकसानीचा दावा केला होता हे खोटे आहे. तसेच त्यात आपण न्यायालयात हजर झालो हे दखील खोटे आहे. तसेच न्यायालयाने त्या खटल्यात आपल्याला जामीन दिला हे देखील खोटे असल्याचे आण्णा हजरे म्हणाले.

काय आहे प्रकरण?

नवी मुंबईतील कळंबोली येथे २००६ मध्ये पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सीबीआयने पद्मसिंह पाटील यांना जून २००९ मध्ये अटक केली. त्यानंतर अलिबाग सत्र न्यायालयाने २५ नोव्हेंबर २००९ मध्ये त्यांना जामिनावर मुक्त केले. पवनराजेंचा आपल्या राजकीय भवितव्याला धोका असल्याचे निंबाळकरांना वाटत होते. म्हणून त्यांनीच पवनराजेंच्या हत्येचा कट आखला. त्यासाठी त्यांनी तीस लाखाची सुपारी दिली. असे या आरोपपत्रात म्हटले आहे.

हत्येच्या कटाचे ते प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप पद्मसिंह पाटील यांच्यावर करण्यात आला आहे. निंबाळकर यांच्या हत्येसाठी सुपारी देणे आणि कटाची आखणी असे गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. केंदीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पनवेलच्या कोर्टात पाच हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआयने यांच्या कुलाबा येथील घरावर टाकलेल्या छाप्यात पिस्तुल, रिव्हॉल्वर, नऊ रायफली, काडतुसे, ५२ तलवारी आणि ५२ लाख रुपये रोख सापडले. विशेष म्हणजे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी त्यांना ‘क्लीन चिट’ दिली होती.

‘पेनकिलर’ खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा

‘मेकअप’ रिमूव्हसाठी बदाम तेल उत्तम

ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसताय मग बदला ‘या’ सवयी

‘गोड पदार्थ’ खाल्यावर लगेच ‘पाणी’ पिण्याने बिघडते आरोग्य

‘वजन कमी’ करण्यासाठी रात्री जेवत नसाल तर होईल ‘हे’ नुकसान

अंडरआर्म्ससाठी ‘डिओ’  विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी

शरीराला ऊर्जा देणारी ‘खारीक’ ‘या’ आजारांनांही करते  दूर