काय सांगता ! होय, खेकडयानं ओढली सिगरेट, मारले दोन ‘कश’, व्हिडीओ पाहिल्यानंतर हसू देखील आवरणार नाही (Video)

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –    एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहून आपण आपले हसणे थांबवू शकणार नाही. या व्हिडिओमध्ये जलीय आणि स्थलीय जीव खेकडा धूम्रपान करण्यात व्यस्त आहे. यासाठी माणूस जबाबदार आहे आणि अशी वागणूक एक दिवस इकोसिस्टम नष्ट करू शकते. याबद्दल लोकांनी विचार केलाच पाहिजे.

या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, काही मुले (बॅकग्राउंडमध्ये ) धूम्रपान करत आहेत. त्यानंतर मुले सिगारेटचा तुकडा जमिनीवर फेकतात. त्या वेळी, खेकडा जात आहे, त्याची नजर सिगारेटवर पडते. दरम्यान, ही गोष्ट नक्की काय आहे आणि त्याचे काय फायदे आणि तोटे आहेत हे त्याला माहिती नाही. तो आपल्या स्वभावानुसार आपल्या नख्यांद्वारे तो तुकडा खाण्याचा प्रयत्न करतो. या दरम्यान, सिगारेटच्या तुकड्यातुन धूर निघतो. या नंतर खेकडा थोडा रिलॅक्स होतो. यानंतर, तो आपल्या पंजाच्या मदतीने सिगारेटचा कश ओढतो. हे पाहून, मुले हसण्यास सुरवात करतात, ज्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो.

भारतीय वन सेवेच्या अधिकाऱ्याने शेअर केला हा व्हिडिओ

हा व्हिडिओ भारतीय वनसेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी सोशल मीडिया ट्विटरवरुन त्यांच्या अकाऊंटवरून शेअर केला आहे. सुशांत नंदाचा हा व्हिडिओ 31 हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि 2 हजाराहून अधिक लोकांनी लाईक केला आहे आणि 700 हून अधिक लोकांनी व्हिडिओ रीट्वीट केला आहे. तर बर्‍याच लोकांनी यावर भाष्य केले आहे ज्यात त्यांनी मुलांवर टीका केली आहे.