Video : डॉगीनं क्षणार्धात हवेत उडी मारत केलं असं कृत्य, व्हिडीओ पाहून व्हाल ‘हैराण’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, जो पाहिल्यास तुम्ही हैराण व्हाल. या व्हिडिओमध्ये डॉगीने दाखवलेले अ‍ॅथलेटिक आणि स्टंट जबरदस्त आहेत. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, एका शेतात पंपिंग हाऊस आहे, ज्याच्या भिंती सुमारे १५ फूट उंच असतील. या भिंतीवर एक पाईप आहे, जो भिंतीपासून दोन फूट उंच आहे. त्या पाईपवर एक कापड लटकत आहे, जे डॉगीला खाली काढायचे आहे.

https://twitter.com/BuitengebiedenB/status/1262503566675185664

डॉगीचा हा स्टंट आश्चर्यचकित करणारा आहे

यानंतर डॉगी मक्याच्या शेतात आपले हावभाव दाखवत काही पावले मागे जातो आणि नंतर पळत जाऊन तो प्रथम भिंतीवर चढतो आणि नंतर भिंतीच्या आधारे हवेत लटकून त्या पाईपमध्ये अडकलेले कापड तोंडाने बाहेर काढून खाली येतो. जेव्हा तो खाली येतो तेव्हा तो हवेतच आपल्या शरीरावर संतुलन राखतो, जेणेकरून तो सहजपणे जमिनीवर उतरू शकेल. डॉगीचा हा स्टंट खूप आश्चर्यचकित करणारा आहे. व्हिडिओ पाहताना असे वाटते की, हा स्टंट करण्यासाठी त्याच्याकडून खूप कष्ट करून घेतले आहेत.

व्हिडिओला Buitengebieden ने शेअर केले आहे

या व्हिडिओला Buitengebieden ने सोशल मीडिया ट्विटरवर आपल्या अकाउंटवरून शेअर केले आहे. सोबत कॅप्शन मध्ये लिहिले आहे, असे होऊ शकत नाही!

व्हिडिओ २ लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे

या व्हिडिओची बातमी होईपर्यंत २ लाख २६ हजारांहून अधिक लोकांनी याला पाहिले आहे आणि ७७० पेक्षा जास्त लोकांना आवडला आहे. तसेच १३७ लोकांनी रीट्वीट केले असून १७ लोकांनी कमेंट केली आहे, ज्यात त्यांनी डॉगीचे कौतुक केले आहे.

एका युजरने लिहिले आहे- हा सुपरडॉग आहे

एक युजर Belinda Marks ने लिहिले आहे- हा सुपरडॉग आहे. आणखी एक युजर Paul Bergum ने आश्चर्य व्यक्त केले आहे. सोबतच डॉगीचे खूप कौतुकही केले आहे. तसेच Ron Horsman युजरने लिहिले आहे- सावधान! आपल्या घराचे मुख्य दार बंद करून ठेवा.