1 लाखाची लाच घेताना IAS अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ओडिशा : वृत्तसंस्था – राज्य दक्षता विभागाच्या वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याला एक लाख रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे ओडिशा राज्यात खळबळ उडाली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार 2009 च्या बॅचचे आयएएस अधिकारी बिजय केतन उपाध्याय यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

आएएस अधिकाऱ्याने एक बिल पास करण्यासाठी एका व्यक्तीकडे एक लाख रुपयाची लाच मागितली होती. ओडिशा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बागवानी यांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्यांच्या घरावर, कार्यालयावर आणि अन्य इतर ठिकाणी छापे टाकण्यात आले असल्याचे सुत्रांनी सांगितले.

आयएएस अधिकारी सध्या ओडिशा सरकारमध्ये हॉर्टीकल्चर डिपार्टमेंट मध्ये कार्यरत आहेत. घटनेनंतर संबंधीत अधिकाऱ्याच्या घरावर, कार्यालयावर आणि इतर ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी एकाचवेळी छापे टाकले. दरम्यान ऑक्टोबर महिन्यात पटनायक सरकारने ‘मो सरकार’ हे अ‍ॅप सुरु केले होते. यामध्ये कोणताही सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असेल तर किंवा त्रास देत असेल तर या अ‍ॅपवरून तक्रारद दाखल करता येऊ शकते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/