वादळात झाला मुलीचा जन्म, नाव ठेवले ‘लेडी फोनी’

भुवनेश्वर : वृत्तसंस्था – ओडीशाच्या किनारपट्टीवर फोनी चक्रीवादळाचा हाहाकार माजला असताना दुसरीकडे एका महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. ओडिसाच्या किनारपट्टीवर फोनी घोंघावत असताना मनचेश्वर रेल्वे हॉस्पिटलमध्ये आज एका गोंडस मुलीने जन्म घेतला. बाळाच्या जन्मानंतर आईने आपल्या मुलीचे नाव ‘लेडी फोनी’ असे ठेवण्यात आले आहे.

लेडी फोनीची आई मनचेश्वर रेल्वे रिपेअर दुरूस्ती विभागात मदतनीस म्हणून काम करते. लेडी फोनी हे तिचे पहिलेच अपत्य आहे. जन्मानंतर आई आणि मुलगी सुखरूप असल्याचे मनचेश्वर रेल्वे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले.

ओडीशाच्या किनारपट्टीवर आज सकाळी आठच्या सुमारास फोनी वादळाने धडक देण्यास सरू केले. अर्ध्या तासानंतर ओडिशाच्या भूमीवर हे वादळ दाखल झाले. यानंतर दोन तासात या वादळाने धुमाकूळ घातला. यामध्ये तीन नागरिकांचा मृत्यू झाला. अशा दु:खद वातावरणात लेडी फोनीचा जन्म झाला.