Government Job : उच्च न्यायालयात सहायक विभाग अधिकारी पदांवर 202 पदांसाठी भरती, पगार 1 लाख रूपये, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ओडिशा उच्च न्यायालयात सहाय्यक सेक्शन ऑफिसरच्या पदांसाठी ही भरती काढण्यात येणार आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार 20 मार्च पर्यंत अर्ज करू शकतात. ही भरती एकूण 202 पदांसाठी होत आहे. ही सहायक विभाग अधिकारी पदासाठी होत आहे. उमेदवार orissahighcourt.nic.in या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता
या पदासाठी उमेदवार हा पदवीधर असावा. तसेच त्याला कॉम्प्युटर हाताळण्याचे चांगले ज्ञान असले पाहिजे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा एक लाख रुपयांपेक्षा अधिक पगार देण्यात येईल. या पदासाठी उमेदवाराची निवड प्राथमिक परीक्षा, लेखी परीक्षा, संगणक अर्ज चाचणी आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

कोण अर्ज करू शकतात
या पदासाठी २१ ते ३२ वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च आहे. ओडिशा उच्च न्यायालयाने या पदासाठी अधिकृत जाहिरात काढली आहे. या पदासाठी उमेदवार orissahighcourt.nic.in या वेबसाइटवरून अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेला १८ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे.

जागांची विभागनी पुढीलप्रमाणे
UR- 105 पदे
SEBC- 23 पदे
SC- 22 पदे
ST- 52 पदे

वेतन
सहाय्यक सेक्शन ऑफिसरची पदे गट ब श्रेणी मध्ये येतात. या नोकरीत उमेदवारांना दरमहा ३५४०० ते १,१२,४०० रुपये पगार मिळेल. या पदासाठी प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारच मुख्य परीक्षेस पात्र ठरू शकेल.

दिल्ली विद्यापीठात शिक्षकेतर पदांसाठी भरती
या व्यतिरिक्त दिल्ली विद्यापीठात शिक्षकेतर पदांसाठीसुद्धा भरती घेण्यात येणार आहे. हि भरती ११४५ पदांसाठी करण्यात येणार आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार recruitment.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकतात. या पदांसाठी १६ मार्च २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात.