ज्या पत्नीचा खून केल्याच्या आरोपाखाली पतीनं भोगली जेलमध्ये शिक्षा, तिच 7 वर्षानंतर दिसली बॉयफ्रेन्डसोबत त्याला

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – ओडिसाच्या केंद्रपाडामध्ये एक अशी घटना घडली की कोणीही ही घटना ऐकून हैराण होईल. 2013 मध्ये पत्नीच्या हत्ये प्रकरणात तुरुंगात गेलेल्या पतीने काही वर्षानंतर पोलिसांच्या मदतीने पत्नीला शोधून काढले. त्यांची पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली आणि या खोट्या प्रकरणाचा खुलासा झाला. अभय सुतार याने 7 फेब्रुवारी 2013 मध्ये इतिश्री मोहराना हिच्याशी विवाह केला होता. अभय केंद्रपाडाच्या चुलिया गावचा रहिवासी आहे. असे सांगण्यात येते की इतिश्रीला अभयशी विवाह करण्यास बळजबरी केली गेली होती.

लग्नाच्या दोन महिन्यानंतर इतिश्री गायब झाली. अभयने 20 एप्रिल 2013 साली पोलिसांना संपर्क साधून पटकुरा पोलिसांकडे आपली पत्नी हरवल्याची तक्रार केली. 14 मे 2013 साली इतिश्रीच्या वडीलांनी प्रल्हाद मोहराना यांनी एक तक्रार दाखल करत दावा केली की अभयने त्यांच्या मुलीला हुंड्यासाठी त्रास दिला होता, त्यानेच मुलीला मारले आणि तिचा मृतदेह फेकून दिला.

त्यानंतर पोलिसांनी अभयला अटक केली होती. एक महिन्यानंतर अभयची जामिनावर सुटका केली होती. त्याने त्यांच्या पत्नीचा शोध सुरु केला कारण त्याला संशय होता की त्याची पत्नी पळून गेली आहे. तो पत्नीचा शोध घेण्यात यशस्वी झाला आणि त्याला कळाले की त्याची पत्नी तिच्या बॉयफ्रेंडसोबत पिपलीमध्ये राहत होती.

इतिश्रीचा पत्ता लागल्यानंतर अभयने पोलिसांची संपर्क साधला आणि सूचित केले. पोलीस अभयला पिपलीमध्ये घेऊन गेले आणि इतिश्रीला तिच्या बॉयफ्रेंड बरोबर ताब्यात घेतले. महिलेच्या बॉयफ्रेंडचे नाव राजीव लोचन मोहराना असल्याचे कळाले.

पटकुरा पोलिसांसोबत तैनात वरिष्ठ अधिकारी सुजीत प्रधान म्हणाले की, दोघांनी सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते, आपल्या जबाबात इतिश्री म्हणाली, लग्नापूर्वी माझे राजीवशी प्रेमसंबंध होते. परंतु आई वडिलांनी अभयशी विवाह करण्यास बळजबरी केली.

तपासात कळाले की इतिश्री आणि राजीव सुरुवातीला गुजरातला गेले होते तेथे ते जवळपास 7 वर्ष राहिले. ते नुकतेच ओडिसाला परतले होते, इतिश्री आणि राजीवला दोन मुलं आहेत.