‘भारत बंद’ला देशाभरात मोठा प्रतिसाद ! आंध्र प्रदेश, ओडिशामध्ये रेल्वे गाड्या अडविल्या, मार्केटयार्डात आवक रोडावली

दिल्ली : कृषी कायदा रद्द करण्याच्या शेतकर्‍यांच्या मागण्यांना २० विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर गेली १३ दिवस दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांनी या भारत बंदला हाक दिली असल्याने त्यांना देशभरात मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

 

 

 

https://twitter.com/ANI/status/1336136716986458112/photo/1

 

 

 

आंध्र प्रदेश, ओडिशामध्ये डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रेल्वेगाड्या ठिकठिकाणी अडविल्याचे दिसून येत आहे. बिहारमधील दरभंगा येथे कार्यकर्त्यांनी रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले आहे.

आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे शेतकरी युनियनच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे रोखून धरली. ओडिशातील भुवनेश्वर येथे शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते रेल्वे रुळावर उतरले असून त्यांनी संपूर्ण रेल्वे वाहतूक रोखून धरली आहे.

आशियातील सर्वात मोठे मार्केट म्हटले जाणारे दिल्लीतील मंढीमध्ये मालाची आवक रोडावली आहे. थोडा फार माल मंढीमध्ये आला आहे. मात्र, त्याला घेण्यासाठी ग्राहक दिसून येत नाही. देशातील बहुतांश शहरांमधील दुकाने बंद दिसून येत आहे. आतापर्यंतच्या वृत्तानुसार देशभरात शांततेत भारत बंदला सुरुवात झाली आहे. सर्वत्र पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला आहे.