ओडिशाने केली 5 राज्यातून येणार्‍या प्रवांशांना कोविड चाचणी बंधनकारक

भुवनेश्वर : देशातील महाराष्ट्र, छत्तीसगड, केरळ, मध्य प्रदेश, पंजाब या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. हे लक्षात घेऊन ओडिशाने या पाच राज्यातून येणार्‍या प्रवाशांना कोविड १९ ची चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.

दिल्ली, कर्नाटक तसेच अनेक राज्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या राज्यातून येणार्‍या प्रवाशांना त्यांची कोविड १९ ची चाचणी बंधनकारक केली आहे.

ओडिशामध्ये २७ फेब्रुवारी रोजी ९४ नवीन कोरोना बाधित आढळून आले होते. सध्या ओडिशामध्ये ६४० अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत ओडिशात ३ लाख ३७ हजार १८ कोरोना रुग्ण आढळून आले असून १ हजार ९१५ जणांचा मृत्यु झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून ओडिशा राज्य सरकारने ही खबरदारी घेतली आहे.