अविश्वसनीय ! अंत्यसंस्काराच्यावेळी त्याचं डोक लहान बाळासारखं ‘हलू’ लागलं, ‘तो’ टकामका पाहू लागल्यानं लोक पळाले

ब्रम्हपूर (ओडिशा) : पोलीसनामा ऑनलाइन – त्याचा मृत्यु झाल्याचे समजून लोकांनी अंत्यसंस्कारासाठी त्याला स्मशानभूमीत नेले. अंत्यसंस्काराची तयारी करीत असतानाच त्याचे डोके हलू लागले. ते पाहून लोकांनी तेथून धुम ठोकली. काही जणांनी त्याला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केल्यावर आता त्याची प्रकृती चांगली आहे. ओडिशा राज्यातील गंजाम जिल्ह्यातील कपकहाला गावात ही घटना घडली. वेळीच शुद्धीवर आल्याने सीमांचक मलिक याचा जीव वाचला.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, मलिक हा मेंढी, बकऱ्या पाळण्याचा व्यवसाय करतो. शनिवारी तो मेंढ्या आणि बकऱ्यांना घेऊन जंगलात गेला होता. सायंकाळी बकऱ्या, मेंढ्या परत घरी आल्या तरी मलिक आला नाही. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्याचा शोध सुरु केला. रविवारी सकाळी काही लोकांना मलिक बेशुद्ध अवस्थेत एका ठिकाणी आढळून आला. त्यांनी त्याला घरी आणले. त्याचा मृत्यु झाला असे समजून नातेवाईकांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरु केली. अंत्यसंस्कारासाठी त्याला स्मशानभूमीत नेण्यात आले. तेथे हवा लागल्याने मलिक याला थोडी शुद्ध आली व त्याचे डोके हलू लागले. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेले लोक घाबरले. काही जण तर पळून गेले. नातेवाईकांनी मलिक हा जीवंत असल्याचे पाहिल्यावर त्याला तातडीने सोराडा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले.

तेथील डॉक्टरांनी सांगितले की, तापामुळे मलिक बेशुद्ध पडला होता. उपचारानंतर आता त्याची प्रकृती सुधारली असून त्याला घरी पाठविण्यात आले आहे. मलिकची पत्नी सोली या सर्व प्रकारानंतर मलिक जीवंत असल्याचे पाहून खुश झाली. पतीचा मृत्यु झाला असे समजण्यापूर्वी त्याला हॉस्पिटलमध्ये का नेले नाही, यावर तिला आता दु:ख वाटत आहे.

Visit : policenama.com

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी