‘या’ मंत्र्याने केला ‘देव’ असल्याचा दावा, मुख्यमंत्र्यांना दिली भगवान जगन्‍नाथची ‘उपाधी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ओडिसामधील एका मंत्र्याने एक वेगळाच दावा केला आहे. त्याने आपण देव असल्याचे सांगितले आहे. एवढ्यावरच ते थांबले नसून या मंत्राने आणखी एक मोठा दावा केला आहे की ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक देखील भगवान जगन्नाथ आहे. आता मंत्र्याने केलेल्या या वक्तव्यावरुन त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. सोशल मिडियावर तर या मंत्र्याच्या वक्तव्याने धुमाकूळ घातला आहे. लोक यामुळे या मंत्र्याला ट्रोल करत आहे.

बरीपाडा येथील हरिबलदेव मंदिरातच या मंत्र्याने हे वक्तव्य केल्याने त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. या मंत्र्याने स्वत:ला ‘बथूडी’ समुदायाचे देवता बादम असल्याचे सांगितले आहे. बुधवारी एका बैठकीत मरांडी यांनी त्या लोकांना हे सांगितले जे लोक राज्य सरकारकडे आपल्या काही मागण्या घेऊन बरीपाडापासून नवीन पटनायक यांच्या निवासस्थानी पद यात्रा काढणार होते.

मरांडी यांनी बैठकी दरम्यान लोकांना पदयात्रा करण्याआधी त्यांना भेटण्यास सांगितले, या मंत्र्याने सांगितले की, त्यांना येथील प्रतिनिधी म्हणून निवडण्यात आल्याने लोकांनी पहिल्यांदा त्यांना येऊन भेटावे, जर तेथे त्यांच्या समस्याचे निवारण झाले नाही तर त्यांनी मुख्यमंत्र्याकडे जावे.

मरांडी यांच्या वक्तव्याला लोकांनी विरोध केला. हरिबलदेव मंदिराचे पूजारी कामेश्वर त्रिपाठी आणि अरूण मिश्रा यांनी विरोध करत सांगितले की त्यांनी याची शिक्षा भगवान जगनाथ देईल.

बरीपाडेचे आमदार प्रकाश सोरेन यांनी मरांडी यांच्यावर टीका केली आणि म्हणाले की मंत्री घमंडी झाले आहेत. एक व्यक्ती कधीच देव असू शकत नाही. येथील बरेच लोक गरीब आहेत आणि त्यांना मूलभूत सुविधा मिळू शकत नाहीत. अशात एक मंत्री आणि आमदार स्वत: देव असल्याचे सांगतो. त्यांना कोणत्या गोष्टीचा गर्व आहे माहित नाही.

आरोग्य विषयक वृत्त-
नंबर वाढला तर चष्म्याची लेन्स नियंत्रित करा, बदलण्याची गरज नाही
रोग प्रतिकारशक्ती दुबळी का होते ? जाणून घ्या
हाडे बळकट बनवण्यासाठी ‘हे’ उपाय आवश्य करा
निरोगी हृदयासाठी योग्य व्यायाम आणि आहार महत्वाचा