#Video : रस्ता खराब बनवला म्हणून आमदाराने इंजिनियरला काढायला लावल्या उठाबश्या !

भुवनेश्वर : वृत्तसंस्था  ओडिसामध्ये एका आमदाराने एका इंजिनियरला रस्ता खराब बनवला म्हणून उठाबश्या काढण्यास लावल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय. ओडिसातील सत्तेत असलेल्या नवनिर्वाचित आमदार सरोज कुमार मेहर यांनी आपल्या विभागातील पटनागढ येथे रस्ता खराब बनवला म्हणून कनिष्ठ अभियंत्याला बळजबरी उठाबशा काढायला लावल्या. जिल्हाधिकारी अरिंदम डाकुआ यांनी सांगितले की पटनागढ मधील उपजिल्हाधिकारी यांनी आवाहल पाठवल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. त्यांनी सांगितले की मी पटनागढ च्या जिल्हाधिकाऱ्यांकडून तात्काळ यांचा आवाहल मागवला आहे.

सूत्रांनुसार आमदार बुधवारी बोलांगीर जिल्हात बेलपाडा प्रखंड येथे गेले होते, त्यावेळी तेथील लोकांनी मांडल बेलपाडा बायपासचे बांधकाम अत्यंत सुमार दर्जाचे झाले असल्याची तक्रार आमदारांकडे केली. त्यानंतर व्हायरल झालेल्या व्हिडिओ मधून मेहर यांनी अभियंत्याशी कसे वर्तन केले हे समोर आले. त्यांनी त्या अभियंत्याला खडेबोल सुनावत त्याला 100 उठाबश्या काढायला सांगितल्या. हा प्रकार बळजबरी झाल्याचे व्हिडिओमधून स्पष्ट होते.

या व्हिडिओमध्ये तो अभियंता कर्तव्यात कसर सोडली म्हणून माफी देखील मागताना पाहायला मिळतं आहे. परंतू आमदार मेहर यांनी त्यांची कोणतीही कबुली ऐकून न घेता त्या अभियंत्याला बळजबरी उठाबश्या काढण्यास लावत आहेत. मेहर यांनी अभियंत्याला लोकांना मारायला लावेल अशी देखील धमकी दिली. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे आमदार मेहर चांगलेच ट्रोल होताना दिसत आहेत.