home page top 1

‘हा’ खासदार माझ्या तोंडावर थुंकला, महिला पत्रकाराची पोलिसांकडे तक्रार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ओरिसातील एका महिला पत्रकाराने बिजू जनता दलाच्या खासदाराविरोधात तक्रार दखल केली आहे. खासदाराने आपल्या अंगावर थुंकल्याची तक्रार या महिला पत्रकाराने केली आहे. त्याचबरोबर त्यानी आपल्याशी गैरवर्तन केल्याचे देखील त्यांनी या तक्रारीत म्हटले आहे. अनुभव मोहंती असं या खासदाराचे नाव असून ते ओडिया चित्रपटातील अभिनेतेही आहेत. महिला पत्रकार खासदाराच्या भावाची तक्रार करण्यासाठी या खासदाराच्या घरी गेली असता त्याने हे कृत्य केल्याचे या महिला पत्रकाराने तक्रारीत म्हटले आहे.

अनुभव मोहंती यांचा भाऊ अनुप्राश याची तक्रार करण्यासाठी त्या खासदाराच्या घरी गेल्या होत्या. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे कि, त्यांच्या भावाने आणि मित्रांनी माझा रस्ता अडवून माझ्याशी गैरवर्तन केलं होते. याविषयी तक्रार करण्यासाठी मी त्यांच्या घरी गेले असता त्यांनी मला शिवीगाळ करत फासावर लटकावण्याची धमकी दिली.

त्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावले आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले, मात्र गाडीत बसत असताना ते आपल्या तोंडावर थुंकल्याची तक्रार त्यांनी केली आहे .दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याविषयी खासदार मोहंती यांना विचारले असता ते म्हणाले कि, खोटी तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सिने जगत –

‘या’ 5 बॉलिवूडच्या ‘टॉप’ अभिनेत्रींनी मृत्यूनंतर मागे सोडली कोटयावधीची संपत्‍ती

सलमान खानवर ‘फिदा’ असलेल्या ‘या’ साऊथच्या अभिनेत्रीला हवी सलमान बरोबर ‘भुमिका’

बॉलीवुडची ‘ही’अभिनेत्री बनली ‘Most Gorgeous Women’, म्हणजेचे नंबर 1

मलाइका-अर्जुन यांच्या नात्याबद्दल अरबाज खानने दिले मिडियाला ‘हे’ उत्तर

Loading...
You might also like