दुर्दैवी ! गवताच्या ढिगार्‍याला आग लागल्यामुळं तिघींचा मृत्यू, सरकारकडून प्रत्येकी 4 लाखांची मदत जाहीर

ब्रह्मपुर : वृत्तसंस्था – गवताच्या ढिगाऱ्याला आग लागून झालेल्या दुर्घटनेत तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज (रविवार) सकाळी अकराच्या सुमारास ओडिसा राज्यातील गंजम जिल्ह्यातील खैराछाता गावात घडली. या घटनेमध्ये एक मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ही दुर्दैवी घटना असल्याचे सांगून दुख: व्यक्त केले आहे. तसेच मृत मुलींच्या नातेवाईंना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत घोषीत केली.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, खैराछाता या गावामध्ये एका गवताच्या ढिगाऱ्याला सकाळी अकराच्या सुमारास आग लागली. यावेळी दहा वर्षापेक्षा कमी वय असलेले साईराम जानी, दीपक गौडा, इतिश्री जीना, अलोक जीना हे खेळत होते. खेळत असताना त्यांना गवताच्या ढिगाऱ्याला आग लागल्याचे समजले नाही.

 

या दुर्घटनेत साईराम, दीपक आणि इतिश्री या मुलांचा भाजल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. तर अलोक जीना गंभीर जखमी झाला. त्याला ब्रह्मपुरी येथील एमकेसीजी मेडीकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, तीन लहान मुलांमध्ये दोन मुलांचा आणि एका मुलीला रुग्णालयात आणण्यात आले त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला होता. तर अलोक हा गंभीर जखमी झाला आहे. अलोक 60 टक्के भाजला असून त्याची प्रकृती नाजूक असून त्याला वाचवण्याचा आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत.

दरम्यान, या घटनेवर दुख: व्यक्त करत ओडीसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मृत मुलांच्या नातेवाईकांना चार लाखांची आर्थिक मदत जाहीर करत त्यांचे सांत्वन केले. तसेच जखमी मुलाचा मोफत उपचार करण्यात येईल अशी घोषणा पटनायक यांनी केली.