हात-पायांमध्ये 31 बोटं, लोक म्हणत होते ‘चुडेल’, गिनीज बुकमध्ये नावाची झाली ‘नोंद’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एखाद्याच्या शरीराचे काही अंग कमी किंवा जास्त असेल तर आपल्या देशातील लोक त्यांना त्रास देतात किंवा त्यांची पूजा करतात. अशी एक महिला आहे. ओडिसाच्या गंजम जिल्ह्यात एक महिला आहे. या महिलेला लोक हडळ म्हणतात. आज या महिलेचे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये दाखल झाले आहे. कोण आहे ही महिला असा प्रश्न तुम्हाला पाडला असेल.

हाथ-पैर में 31 उंगलियां, लोग कहते थे चुड़ैल, गिनीज बुक में नाम दर्ज

ओडिसाच्या गंजम जिल्ह्यात राहणाऱ्या महिलेचे नाव नायक कुमारी आहे. 63 वर्षीय नायक कुमारीच्या पायाला 19 आणि हातात एकूण 12 बोटं आहेत. म्हणजेच एकूण मिळून 31 बोटं. याच बोटांमुळे नायक कुमारीचे नाव गिनीज बूकमध्ये नोंदवण्यात आले.

गंजम जिल्ह्यातील ज्या गावात नायक कुमारी राहते तेथील लोक तिच्या जवळ देखील जात नाहीत. लोक तिच्या बोटांमुळे तिला हडळ म्हणतात. एवढेच नाही तर तिला गावाच्या बाहेर देखील काढले होते. जर ती कोणाकडे गेली तर तिला मारहाण करण्यात येत होती.

हाथ-पैर में 31 उंगलियां, लोग कहते थे चुड़ैल, गिनीज बुक में नाम दर्ज

नायक कुमारी गावाच्या बाहेर एका झोपडीत राहते. गरीब असल्याने ती उपचार करु शकली नाही. कुटूंबाने तिला सोडून दिले आहे. तिच्याशी कोणतीही व्यक्ती बोलत नाही.
या आजाराला पॉलिडॅक्टिली (Polydactyly) म्हणतात. हा अत्यंत साधारण रोग आहे. हा रोग 5000 लोकांमध्ये एकाला होतो. परंतु इतक्या जास्त प्रमाणात बोटं असणं असामान्य आहे.

हाथ-पैर में 31 उंगलियां, लोग कहते थे चुड़ैल, गिनीज बुक में नाम दर्ज

आता लोकांच्या मते कुमारीचे नाव गिनीज बुकमध्ये दाखल झाल्यानंतर तिची गरीबी कमी होऊ शकते. सरकारी-गैर सरकारी संस्थांकडून तिला मदतीची घोषणा देखील केली जात आहे. सरकारने पहिल्यांदाच तिच्याकडे लक्ष दिले आहे. असे ही म्हणले जात आहे की ओडिसा सरकार नायक कुमारीला घर आणि पेंशन देईल. असे झाल्यास तिच्या जीवनात सुधार होईल.

हाथ-पैर में 31 उंगलियां, लोग कहते थे चुड़ैल, गिनीज बुक में नाम दर्ज