पिंपरी : दरोडा, जबरी चोरी, वाहन चोरी, घरफोडीचे तब्बल १८ गुन्हे उघड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

दरोडा, घरफोडी, वाहन चोरी, जबरी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याना पकडून पिंपरी पोलिसांनी तब्बल १८ गुन्हे उघडकीस आणले आहेत. यामध्ये २० तोळे सोन्याचे दागिने, दहा दुचाकी, एक चार चाकी, पाच मोबाईल, घडयाळ, दोन गावठी पिस्तुल, जिवंत काडतुसे, रोख रक्कम, कटावणी, चाव्यांच्या बंडल, एक एयर गन जप्त केले असल्याची माहित अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दोन दिवसांपूर्वी रमाबाईनगर, पिंपरी येथे भरत सुरेश जैन याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले एक लाख ७५ हजार रुपये जबरदस्तीने चोरुन नेले होते. याचा तपास पिंपरी पोलिस करत होते. यावेळी तपास पथकाचे सहायक निरीक्षक सतीश कांबळे यांना मिळालेल्या माहितीनुसार आयुब नजीर शेख (२३) आणि मस्तान अहमद कुरेशी (२३, दोघे रा. देहूरोड) या दोघांना अटक केली. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यानी गुन्हा केल्याची कबुली दिली. मात्र गुन्हा करताना दहा साथीदार असल्याचे सांगितले. त्यानुसार सलमान मेहबूब शेख (२२), रफिक अब्दुल शेख (१९), सिद्धीक आताकुररेहमान शेख (२३), नियाज जमीर शेख (२१), नवशाज नजीर शेख (२०) या पाच जणांना अटक केली. या सात जणांकडून पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेला दरोडा आणि जबरी चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांच्याकडून ४० ग्रॅम सोन्याचे दागिने, ७२ हजार रुपये, तीन दुचाकी आणि चार मोबाईल असा पाच लाख ६७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. तर आल्ताफ बबलू रंगरेज, साबीर समीर शेख आणि लाला शेख हे फरार असून त्यांच्या शोध सुरू आहे.

‘अॅट्रोसिटी’तील बदलाची सुप्रीम कोर्ट पडताळणी करणार

तपासी पथकातील कर्मचारी महादेव जावळे यांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीवरून विकास सुनील घोडके (२१, रा. वडगाव शेरी, पुणे) आणि कुलदीप तानाजी शिंदे (२०, रा. चंदननगर) या दोघांना अटक केली आहे. यांच्याकडून घरफोडीचे चार आणि सोनसाखळी हिसकल्याचा एक गुन्हा उघडकीस आणला. यामध्ये २० तोळे सोन्याच्या दागिन्यासह सहा लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

पोलीस नाईक श्रीकांत जाधव, रोहित पिंजरकर यांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सलमान गौस शेख (२४, रा. मिलिंदनगर, पिंपरी) याला अटक करून तपास केला असता त्याच्याकडून एक लाख ५५ हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत.  तसेच राहुल हिरालाल भांडेकर (२०, रा. गांधीनगर, पिंपरी) याला अटक करून एक मोबाइल आणि घड्याळ असा १३ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

पुणे : सवलतीच्या दरात विमान तिकीट देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणारे अटकेत

बुधवारी आणि गुरुवारी पिंपरी मिलिंदनगर, रामनगर येथे पोलिसांनी कोम्बिग ऑपरेशन केला असता तडीपार गुन्हेगार राहुल उर्फ भडज्या अर्जुन गोरे (२४, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) याला अटक करून त्याच्याकडून सात हजार किंमतीचे गावठी कट्टा जप्त करण्यात आला. तर तडीपार गुन्हेगार स्वप्नील उर्फ बाळू नामदेव शेलार (२६, रा. दत्तनगर, चिंचवड) याला अटक करून ३१ हजार रुपये किंमतीचे देशी बनावटीचे पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

ही जम्बो कामगिरी पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ निरीक्षक विठ्ठल कुबडे, रंगनाथ उंडे, तपासी पथकाचे सहायक निरीक्षक सतीश कांबळे, उपनिरीक्षक विठ्ठल बडे, राजेंद्र भोसले, शाकिर जीनेडी, नागनाथ लकडे, महादेव जावळे, श्रीकांत जाधव, संतोष दिघे, राजू जाधव, संतोष भालेराव, रोहित पिंजरकर, उमेश वानखेडे, विद्यासागर भोते, अविनाश देशमुख, गणेश खाडे, नामदेव राऊत, गणेश करपे, सोमेश्वर महाडिक, विकास रेड्डी, विष्णू भारती, किर्ती घारगे या पथकाने केली.

[amazon_link asins=’B00L8PEEAI,B072X2BGM5′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’134cf99c-b28b-11e8-9696-d97f11ec3193′]