‘ऑफ द रेकॉर्ड’ ! भाजपचा ‘आशावाद’, शिवसेनेबाबत अद्यापही ‘नरमाई’ची ‘भूमिका’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपला अजूनही महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेची परिस्थिती बदलेले अशी आशा आहे. तिकडे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बोलणी अंतिम टप्प्यात येऊन पोहचलेली आहेत. मात्र भाजप अजून शिवसेना युतीमध्ये परत येईल या आशेवर थांबली आहे. गेल्याच आठवड्यात नितीन गडकरी म्हणाले होते की, राजकारण हा सुद्धा क्रिकेट सारखा एक खेळ आहे जो कधीही बदलू शकतो.

शिवसेना आणि त्याच्याबाबतच्या हिंदुत्ववादी विचारांवर अजून चर्चा सुरु असल्याचे शरद पवारांनी म्हंटले आहे तर भाजप हायकमांडने केंद्रीय मंत्र्यांना आणि प्रवक्त्यांना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबत कोणतीही टिका न करण्यास सांगितले आहे.

भाजपच्या अमित शहा यांनी शिवसेनेच्या वक्तव्यांबाबत मौन सोडले आणि ते म्हणाले, जेव्हा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सत्ता स्थापन करतील तेव्हा हिंदू पार्टी आणि विकासाच्या नावावर आमचा पक्ष मोठ्या प्रमाणावर वाढेल. यावेळी शहांनी ठाकरेंवर व्यक्तिगतरीत्या टीका करणे देखील टाळले.

भाजप यामुळे परेशान आहे की, महाराष्ट्र सारख्या मोठ्या राज्यात सर्वाधिक जागा जिंकून पण भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. तर राष्ट्रवादीच्या शरद पवारांनी काँग्रेस नेतृत्व सोनिया गांधी यांची मनधरणी करण्यात यश मिळवलं असल्याचे बोलले जात आहे.

भाजप आता हिंदुत्ववादी मुद्दा पुढे करत ठाणे, कोकण अशा अनेक ठिकाणी अभियान सुरु करून सेनेचे मताधिक्य कमी करण्याचा निश्चित प्रयत्न करेल. भाजप यावर लक्ष ठेऊन आहे की, काँग्रेस सोबत राहून शिवसेना कशाप्रकारे आपलं हिंदुत्व टिकवणार. कारण शिवसेना आक्रमक हिंदुत्ववादी आहे.

Visit : Policenama.com