काळ्या जादूने पाकिस्तानला हादरवले ! PM इम्रान करतात काळी जादू ? , जाणून घ्या काय आहे प्रकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान काळ्या जादूचे अनुयायी असल्याच्या चर्चांना मोठ्या प्रमाणावर उधाण आले आहे. भारताने याबाबत माहिती गोळा करण्यास सुरवात केली आणि हे जाणून आश्चर्यचकित व्हाल की इम्रान काळ्या जादूवर विश्वास ठेवणारे आहेत आणि संपूर्ण पाकिस्तान त्याबद्दल चर्चा करत आहे. यापूर्वी कोणत्याही देशाच्या राज्यकर्त्याने तो काळ्या जादूचा अनुयायी असल्याचे जाहीरपणे कधीच सूचित केलेले नव्हते. काश्मीर प्रकरण आणि आर्थिक आघाडीवर अपयश आल्यानंतर इम्रान खान आता अंधश्रद्धेचा मार्ग स्वीकारत आहेत.
Bushara Bibi

ट्रम्प भेटीवेळी काळी जादू ?
इम्रानने अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली तेव्हा हे दिसून आले. या भेटीवेळी त्यांनी पठाणी सूट आणि जॅकेट घातलेली शाल परिधान केली होती. आश्चर्य म्हणजे यातील प्रत्येकाचा रंग काळा होता. इथपर्यंत ठीक होतं पण यावेळी इम्रान यांच्या हातात एक माळ होती आणि ते ती सतत फिरवत काही मंत्र म्हणत होते. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. पाकिस्तान टीव्ही चॅनल्सवर इम्रानची काळी जादू मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली. पाकिस्तानी टीव्ही वाहिन्यांचे म्हणणे आहे की इम्रानची तिसरी पत्नी बुशरा त्याच्या आयुष्यात आल्यानंतर ते अंधश्रद्धेच्या आहारी गेले आहेत.

पाक टीव्ही वाहिन्यांचा असा दावा आहे की बुशराकडे अति नैसर्गिक (supernatural) शक्ती आहेत. पाकिस्तानी टीव्ही वाहिन्यांच्या म्हणण्यानुसार, बुशराच्या प्रभावामुळे इम्रानने सभेत काळे कपडे घातले आणि माळ फिरवत काही मंत्र उच्चारले जेणेकरून ट्रम्प यांचे मन बदलेल आणि ते पाकिस्तानच्या बाजूने वक्तव्य करतील.
Bushra Bibi

बुशरा यांच्याबद्दलचे अजब दावे :
अशा ऐतिहासिक आणि चांगल्या प्रसंगी काळा रंग अशुभ मानला जातो. परंतु इम्रानने बुशराच्या सांगण्यावरून असे कपडे परिधान केले. पाकिस्तानच्या लोकांचा असा विश्वास आहे की बुशरा जवळ दोन जिन असून त्यांचा वापर बर्‍याच वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. तसेच तिचे चित्र आरशात दिसत नाही असाही दावा केला जातो. पाकिस्तानचे भविष्य देशाची पहिली महिला बुशरा यांच्या हाती आहे. पाकिस्तान आणि तिच्या पतीच्या राजकीय कारकीर्दीवर त्याचा काय परिणाम होईल हे लवकरच दिसून येईल.

Visit : Policenama.com