मान्सूनमध्ये फिरण्यासाठी जायचंय मग ‘ही’ ५ ठिकाणे देतील ‘स्वर्गीय’ अनुभूती

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मान्सून सुरु झाल्यानंतर पावसानेही जोरदार हजेरी लावल्यामुळे निसर्ग सर्वत्र बहरून आला आहे. यानंतर अनेकांना फिरायला जाण्याचे वेध लागले आहेत. निसर्गप्रेमींना निसर्ग खुणावतो आहे तर गिरीप्रेमींना गड-किल्ले खुणावत आहेत. पावसाची मजा लुटण्यासाठी अनेकजण फिरायला जाण्यासाठी तयारीदेखील करत असतील. आता आम्ही तुम्हाला या प्लॅनिंगसाठी उपयोगी ठरतील अशी देशातील काही खास ठिकाणे देत आहोत.

१. मतियाना, हिमाचल प्रदेश :
हिमाचल प्रदेशातील मतियाना हे एक अत्यंत सुंदर आणि प्रसिद्ध हिलस्टेशन आहे. पावसाळ्यात येथील वातावरत अत्यंत नयनरम्य असून पर्यटकांच्या आकर्षणाचं हे एक मोठं केंद्रबिंदू आहे. मतियाना हे निसर्गाच्या आणि डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसलेलं एक गाव असून येथील कोणत्याही उंचावरच्या ठिकाणी राहून खाली बघितल्यास तुम्हाला जणू काही आकाशातच असल्याची जाणीव होते. याच कारण आहे येथील दाट धुकं यामुळे तुम्ही ढगांमध्ये असल्याची अनुभूती तुम्हाला मिळते.

२. रूपनगर, पंजाब :
रुपनगर हे शहर चंदिगड पासून जवळपास ५० किमी तर दिल्लीपासून २०० किमी दूर असून सतलज नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं अत्यंत सुंदर ठिकाण आहे. येथे अप्रतिम निसर्गसौंदर्याशिवाय अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणेही आहेत. येथे तुम्हाला हडप्पा आणि सिंधू संस्कृतीची वैशिष्ठ्ये असणारी ठिकाणे पाहावयास मिळतील.

३. ओरछा, मध्यप्रदेश :
पर्यटकांच्या दृष्टीने हे एक शांत आणि निवांत ठिकाण म्हणून ओळखले जाते. बेटवा नदीचा प्रदीर्घ किनारा या शहराला लाभला असून येथे तुम्ही मान्सूनचा आनंदही मनमुराद लुटू शकता. येथे किल्ले आणि मंदिरेही मोठ्या प्रमाणावर आहेत. या शहराला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्याने तुम्हाला पाहण्यायोग्य ठिकाणांची कासलीही कमतरता नाही.

४. बिलासपुर, हिमाचल प्रदेश :
दिल्लीपासून बिलासपूर हे ठिकाण जवळपास साडेतीनशे किमी अंतरावर आहे. भाक्रा नांगल धरण हा येथील आकर्षणाचा सर्वोच्च बिंदू असून एकदा पाहिल्यास येथील दृश्य मनःपटलावरून जाऊच शकत नाही इतकी सुंदर आहेत. गोविंद सागर तलाव, व्‍यास गुहा, कंदरूर ब्रिज इत्यादी येथील पाहण्यायोग्य ठिकाणे आहेत.

५. बुंदू, राजस्थान :
तसे पाहता राजस्थानमधील मेवाड हा भाग पूर्णपणे निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. मान्सूनचा काळ हा येथे पर्यटन करण्यासाठी वर्षातील सर्वाधिक योग्य काळ आहे. येथील बुंदू हे ठिकाण पर्यटकांच्या आकर्षणाचे विशेष केंद्र असून मान्सूनच्या पावसात येथील सहल तुम्हाला नक्कीच स्वर्गीय अनुभूती देईल.

मान्सूनमधील सफरीसाठी हि देशातील सर्वोत्तम ठिकाणे असून पृथ्वीवरील स्वर्ग पाहायचा असेल तर तुम्हाला येथील सहल केलीच पाहिजे.
आरोग्य विषयक वृत्त-
छातीत होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष नको , होऊ शकतो हा ‘आजार’
वजन कमी करण्यासाठी वेगन डाएट ला अनेकांची पसंती
चेहऱ्यावर काळे डाग आहेत का ? हे घरगुती रामबाण उपाय करा
डोळ्यांवरून समजू शकते; तुमचे आरोग्य कसे आहे