५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पुण्यातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायकाविरोधात गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – फुटबॉल मॅचेससाठी स्टेज परवाना देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पुण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सब डिव्हीजन क्रमांक ३ येथील स्थापत्य अभियांत्रिकी सहायकाविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन गोपाळराव गार्डे (वय ४७, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, सब डिविजन शाखा क्र ३ सार्वजनिक बांधकाम विभाग) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.

तक्रारदार यांनी फुटबॉल मॅचेससाठी स्टेज परवानगी मिळावी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंगळवार पेठेतील सब डिवीजन क्रमांक ३ येथे अर्ज केला होता. त्यावेळी तेथील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक नितीन गार्डे याने तक्रारदाराला ५ हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदार यांनी अँटी करप्शनकडे तक्रार केली. त्यानंतर १ नोव्हेंबर २०१८ रोजी या तक्रारीची पडताळणी केली तेव्हा नितीन गार्डे याने ५ हजार रुपयांची लाच आणि फुटबॉल मॅचसाठी पासेसची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याच्याविरोधघात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक संदिप दिवाण, अप्पर पोलीस अधिक्षक दिलीप बोरस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी करप्शनच्या पथकाने केली.

एखाद्या लोकसेवकाने लाच मागितल्यास त्यासंदर्भात अँटी करप्शनच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक संदिप दिवाण यांनी केले आहे.

You might also like