३० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी R.T.O विरोधात गुन्हा

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – ३० हजार रुपयांची मागितल्याप्रकरणी धुळ्याच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याविरोधात (आरटीओ) अँटी करप्शनने गुन्हा दाखल केला आहे.

पी. के. तडवी (रा. दत्त कॉलनी देवपूर धुळे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरटीओचे नाव आहे.

तक्रारदार यांची रस्ता सुरक्षा फाउंडेशन ही संस्था आहे. ही रस्ते अपघात कमी करण्याच्या अनुशंगाने रस्त्यावरील वाहनांना रेटरो रिफ्लेक्टिव्ह टेप लावणे, रस्ता सुरक्षा संदर्भात जनजागृती करणे, त्यासाठी लागणारे व्हाउचर्स, पुस्तके, स्टिकर्स, या साहित्यांची अत्यल्प दरात विक्री करण्याचे काम साईनाथ एजन्सी या संस्थेमार्फत करतात. सन २०१९ च्या रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त तक्रारदार यांनी वरील साहित्यांचा पुरवठा केला होता.

याबाबात त्यांना १ लाख ८० हजार रुपयांचे बिल जमा केले होते. त्यानंतर याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे तडवी यांनी ४० हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यासंदर्भात तक्रारदार यांनी लाचलुचपतकडे तक्रार केली. याची २६ एप्रिल रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान तडवी यांनी तडजोडीअंती ३० हजार रुपये लाचेची मागणी केली आणि ती कार्यालयातील कर्मचा-याकडे रक्कम देण्यास सांगितले. परंतु कार्यालयातील कर्मचाऱ्याने रककम स्विकारली

नाही. तसेच. तडवी यांनी देखील ती स्विकारली नाही. त्यांनतर तडवी यांच्याविरुध्द देवपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुनिल कुराडे, पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर व त्यांच्या पथकातील कर्मचारी जयंत साळवे, संतोष हिरे, संदीप सरग, सुधीर सोनवणे, कृष्णकांत वाडीले यांच्या पथकाने केली.

Loading...
You might also like