४ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी तलाठ्यावर गुन्हा

जळगाव  : पोलीसनामा ऑनलाईन –४ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जळगाव तालुक्यातील नांद्रा बु. च्या तलाठ्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितिन किशोर पाटील, (वय-४४, तलाठी नांद्रा बु ll,ता.जि.जळगाव, रा. गट नं.326/1, प्लॉट नं.31, कानळदा रोड, श्री गजानन नगर, जळगाव, ता.जि.जळगाव. वर्ग-3 )असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.

तक्रारदार यांच्या पत्नीच्या नांद्रा येथे शेतजमीन आहे. ही शेतजमीन बक्षिसपत्राव्दारे तक्रारदार यांच्या नावावर करण्याच्या मोबादल्यात तलाठी नितीन पाटील यांनी ७ फेब्रुवारी रोजी ४ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर त्यांनी लाच मागणी करून लाच मिळविण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्यांच्याविरोधात अँटी करप्शनने लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading...
You might also like