पुण्यातील ‘त्या’ राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – तळजाई टेकडीवर महापालिकेच्या सौर उर्जा प्रकल्प आणि पार्किंगला अडथळा ठरणाऱ्या झाडांची पाहणी कऱण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विरोध करणाऱ्या राष्ट्रवादी नगरसेवकासह आठ ते नऊ जणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकऱणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

महापालिकेतील अधिकारी विनायक जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुभाष जगताप यांच्यासह आठ ते नऊ जणा विरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकऱणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळजाई टेकडीवरील क्रिकेट मैदानासमोर महापालिकेकडून पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच तेथे सौर उर्जा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी येथे अडथळा निर्माण कऱणाऱ्या झाडांची पाहणी कऱण्यासाठी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास टेकडीवर आले होते.

त्यावेळी जगताप कार्यकर्त्यांसह तेथे दाखल झाले. त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर स्थानिक नागरिक, सामाजिक, स्वयंसेवी संस्थांनी झाडे लावून ती जगविली आहेत. त्यामुळे झाडे तोडून या भागात प्रकल्प राबवू नये, अशी मागणी करत जगताप यांनी झाडांची मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना विरोध केला.