‘त्या’ आंदोलनाप्रकरणी माजी आमदाराविरुद्ध गुन्हा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नेवासा तालुक्यातील सोनई-करजगावसह 18 गावांच्या पाणी योजनेसाठी रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी तब्बल चार दिवसानंतर माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आज सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शनिवारी (दि. 13) राहुरी-सोनई रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. नेवासा तालुक्यातील पिण्याच्या पाणी प्रश्न, शेतीच्या पाण्याचा प्रश्न, तसेच ईतर सामाजिक प्रश्नी गडाखांनी आंदोलने केलेली आहे. मागील आठवड्यात सोनई-करजगांवसह 18 गावांच्या पाणी योजनेच्या प्रश्नावरून या सर्व गावांच्या ग्रामस्थांसह गडाख यांनी सोनईत सुमारे तीन तास रास्ता रोको केला होता. जमावबंदी आदेश असतानाही विनापरवाना रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला.

सोनई पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी काकासाहेब देविदास मोरे यांच्या फिर्यादीवरून माजी आमदार शंकरराव गडाख, दादासाहेब शंकर वैरागर, संदीप अशोक कुसळकर, खलील इनामदार, किरण जाधव, गणेश तांदळे, संजय जंगले, यांच्यावर सोनई पोलीस ठाण्यात भादवि कलम 143, 149, 341 तसेच मुंबई पोलीस कायदा कलम 37, 1(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनई पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

आरोग्य विषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like