वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे ‘कामकाज’ पाहणार्‍या कर्मचार्‍यांवर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

धनकवडी परिसरातील अहिल्यादेवी चौकातील पान टपरी बंद करण्यापुर्वी सहकारनगर पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचार्‍यांमध्ये वाद झाल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, बीट मार्शलने दिलेल्या फिर्यादीवरून सहकारनगर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचार्‍याविरूध्द सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यातच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ज्या पोलिस कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो पोलिस कर्मचारी ‘वजनदार’ असून गेल्या काही वर्षापासुन तो वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे ‘कामकाज’ पाहत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
[amazon_link asins=’B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c1a8c98a-b350-11e8-b291-e98d94a13eaf’]

पोलिस नाईक संजय भापकर (बक्‍कल नं. 5380) यांच्यासह शैलेश पवार (रा. उर्मिला सोसायटी, धनकवडी) यांच्याविरूध्द सहकारनगर पोलिस ठाण्यात भादंवि 353,504,506 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी गंगाधर बापुराव वागलगाव (बक्‍कल नं. 7758) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी वागलगाव यांच्याकडे बालाजीनगर मार्शलची ड्युटी आहे तर पोलिस नाईक संजय भापकर हे सहकारनगर पोलिस ठाण्याचे ‘कामकाज’ पाहतात.

जाहिरात

दि. 5 सप्टेंबर 2018 रोजी रात्री एक वाजता अहिल्यादेवी चौकातील मॉन्स्टर एनर्जी पॉईंट येथे पान टपरी चालु होती. बालाजीनगर मार्शल ड्युटी असल्याने फिर्यादी वागलगाव यांनी ती पान टपरी बंद करण्यास सांगितली होती. सहकारनगर पोलिस ठाण्याचे सर्व ‘कामकाज’ संजय भापकर हे पहात असल्याने त्यांच्यात आणि मार्शल ड्युटीचे वागलगाव यांच्यामध्ये वाद झाले. दि. 5 सप्टेंबर ही घटना घडली.

त्यानंतर भापकर आणि वागलगाव यांच्यामध्ये प्रचंड वाद झाले. भापकर यांनी सरकारी कामात अडथळा आणला म्हणून वागलगाव यांनी तक्रार केली. मात्र, सर्व ‘कामकाज’ पाहणार्‍या भापकर यांच्याविरूध्द वरिष्ठांनी कुठलीही कारवाई केली नाही. अखेर प्रकरण वाढल्यानंतर भापकर आणि शैलेश पवार यांच्याविरूध्द सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दि. 3 ऑगस्ट रोजी पुणे पोलिस आयुक्‍त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर शहरात रात्री उशिरापर्यंत चालणार्‍या हॉटेल आणि इतर गोष्टींवर निर्बंध आणले जातील असे सांगितले होते. तसा आदेश आयुक्‍तांनी सर्व संबंधित अधिकार्‍यांना देखील दिला होता. तरी देखील शहरातील बहुतांश पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस ठाण्याचे ‘कामकाज’ पाहणार्‍यांच्या आर्शिवादाने तसेच काही वरिष्ठांच्या आर्शिवार्दाने रात्री एक-दोन वाजेपर्यंत पान टपरी, हॉटेल्स आणि इतर काही गोष्टी चालु असल्याचे पहावयास मिळत आहे.

जाहिरात

सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेवरून शहरातील काही पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्व काही अलबेल असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे कामकाज पाहणार्‍या पोलिस कर्मचार्‍यावर केवळ गुन्हा दाखल झाल्यानंतर हा विषय संपणार का की संबंधित वरिष्ठांवर देखील कारवाई केली जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री एक वाजेपर्यत पान शॉप्स आणि काही हॉटेल चालु असल्याचे उघडकीस आल्याचे समोर आले आहे. दरम्यान, दोन पोलिस कर्मचार्‍यांमध्ये सरकारी काम करणार्‍यावरूनच वाद झाल्याने पोलिस दलात प्रंचड खळबळ उडाली आहे.
[amazon_link asins=’B07B6SN496′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’794d9345-b351-11e8-a6ac-e73814d8e316′]

घडलेल्या प्रकरणाची चर्चा आणि वस्तुस्थिती :-
पान टपरी वेळेत बंद करण्याच्या हेतूनेच फिर्यादी वागलगाव हे रात्री एक वाजता पान टपरीवर गेले होते असे नमुद करण्यात आले आहे. मात्र, फिर्यादी वागलगाव यांनी त्यावेळी पान टपरी चालकाकडे काही तरी मागितले होते अशी चर्चा असून त्या मागणी बाबत पोलिस ठाण्याचे ‘कामकाज’ पाहणार्‍या संजय भापकर यांनी वागलगाव यांच्याकडे जाब विचारला होता आणि त्यावरूनच दोघांमध्ये वाद झाले आणि नंतर सरकारी कामकाजात अडथळा आला ही वस्तुस्थिती असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

अन्य बातम्याः
कमर बाजवांचा बाजा मोदी वाजवणार का? : शिवसेना 

बनावट नाेटा टाेळीची पाळेमुळे पश्चिम बंंगालपर्यंत : एटीएस पथक सांगलीत दाखल

यंदाच्या गणेशोत्सवावर महागाईचे सावट