पुणे : खासदार प्रीतम मुंडे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या शिक्षकाला फेसबुक लाईव्ह करुन चोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

निगडीमध्ये एका शिक्षकाने बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्यावर आक्षेपर्ह टिप्पणी केली. या शिक्षकला फेसबुक लाईव्ह करुन माफी मागायला लावून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’15e20318-b440-11e8-9c95-61a608691951′]

संजय कुऱ्हाडे असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. कुऱ्हासह पाच ते सहा जणंविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलांविषयी बेताल वक्तव्य करणारे भाजपचे आमदार राम कदमांच्या वक्तव्यावरून संजय कुऱ्हाडे यांनी आक्षेपर्ह टिप्पणी केली हाेती. याच रागातून गणेश कराड आणि त्याच्या साथीदारांनी फेसबुक लाईव्ह करून मारहाण आणि शिवीगाळ केली.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1b2cb012-b440-11e8-ad7d-39ab99b31306′]

संजय कुऱ्हाडे यांनी राम कदमांच्या वक्तव्याबाबतच्या एका पोस्टवर ही कमेंट केली होती, ज्यानंतर वाद निर्माण झाला. संजय कुऱ्हाडे हे कॅम्प एज्युकेशनमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आज दुपारी गणेश आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कुऱ्हाडेंना निगडी येथील निवेदिता बँकेसमोर बोलावून घेतलं. फेसबुक लाईव्ह सुरू केलं. आधी पोस्ट केलेल्या वक्तव्याची माफी मागायला लावली आणि मग शिवीगाळ करत मारहाणही केली.

याप्रकरणी निगडी पोलिसांनी मारहाण आणि अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गणेश कराड आणि त्याचे सहकारी हे मुंडे समर्थक असल्याची माहिती समोर येत आहे.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी