धक्कादायक ! भाजप नेत्याचे मॉडेलसोबतचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, प्रचंड खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपा (bjp) युवा मोर्चाचे नेते विकास दुबे यांचा एका मॉडेलसोबतचा आक्षेपार्ह परिस्थितीतील फोटो सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे कानपूर भाजपमध्ये (bjp) मोठी खळबळ उडाली आहे. व्हायरल झालेले फोटो 2 वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जात आहे. फोटोतील मॉडेल कॉलगर्ल असल्याचे सांगितले जात असून एका बारमध्ये हा फोटो टीपण्यात आला आहे.

तुरुंगातील ‘या’ अभिनेत्यांवरुन दोन अभिनेत्रीमध्ये रंगल Twitter war, ती म्हणाली – ‘तुला का मिर्ची लागली?

विकास दुबे हे कानपूर-बुंदेलखंड विभागाचे भाजप (bjp) युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत.
दुबे यांच्यासोबत कानपूरमधील एक पोलीस अधिकारी आणि त्यांचे राजकीय मित्र परिवार नेपाळ येथे पर्यटनासाठी गेले होते.
एका बारमध्ये असताना व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले.
यात दुबे एका मॉडेलसोबत अश्लिल पद्धतीने वर्तन करत असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत पक्षातील वरीष्ठांकडे तक्रार केली गेली नसल्याचे सांगण्यात आले.
पण विकास दुबे यांच्याबाबत कुणीही साक्ष देण्यास तयार नसल्याने त्यांच्यावर अद्याप पक्षांतर्गत कारवाई झाली नाही.

दुबे यांच्याकडे 17 जिल्ह्यांची जबाबदारी
कानपूर-बुंदेलखंड विभागाअंतर्गत एकूण 17 जिल्ह्यांचा समावेश आहे. याचा भाजप प्रभारी म्हणून विकास दुबे कार्यरत आहेत. त्यांच्यावर अनेक आरोप असतानाही 2018 साली पुन्हा एकदा दुबे यांना विभाग अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. दुबे यांच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. यात खुनाचा प्रयत्न, अवैध पद्धतीने शस्त्रास्त्र बाळगणे अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.

Also Read This : 

IBPS RRB PO/Clerk Notification 2021 | बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी ! 10466 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

 

Bribery | लाचखोरीच्या आरोपावरून पोलिस उपनिरीक्षकासह चौघे तडकाफडकी निलंबीत