उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाबत आक्षेपहार्य वक्तव्य, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून ‘त्या’ महिलेविरूध्द गुन्हा

शिक्रापुर : राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपहार्य विधान करूत ती पोस्ट सोशल मिडीयावर व्हायल करत बदणामी केल्याबाबत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये एका महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या बाबतीत मिळालेल्या माहितीनुसार मुंबई येथे सारथी संस्थेच्या बाबतीत अजित पवार व इतर नेत्यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर. संध्याकाळी सोशल मिडियावर लाइव्ह येत एका महिलेकडून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व इतर नेत्यांबाबत अत्यंत खालच्या पातळी आक्षेपहार्य वक्तव्य करत ती पोस्ट सोशल मिडीयावर टाकण्यात आली.

याबाबत शिरूर तालुक्यातील एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांने वरिष्ठ कार्यकर्त्यांशी चर्चा करून शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापुर पोलिस करत आहेत