भाजप नगरसेविकेच्या जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड, कार्यकर्त्यांनाही मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बिबवेवाडी प्रभाग क्रमांक 37 मधील भाजपच्या विद्यमान नगरसेविका वर्षा भीमराव साठे यांच्या जनसंपर्क कार्यालयात येऊन कार्यकर्त्यांना तुमचे साहेब कुठे आहेत त्यांचा नंबर द्या अशी शिवीगाळ व दमदाटी करत टेबलवरील काच फोडली. त्यानंतर कार्यकर्त्यांना मारहाण करत धारदार हत्याराचा धाक दाखवून तुमच्याकडे बघून घेतो अशी धमकी दिली. त्यानंतर पोलिसांनी तिघांसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी भाजप नगरसेविका वर्षा साठे यांचे पती भीमराव साठे यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून बसवेश्वर आनंद ख्याले(वय २४, रा. बी/74,सुपर इंदिरानगर,बिबवेवाडी,पुणे), किरण बबन जाधव (वय ३२, रा. बी/५२, सुपर इंदिरानगर,बिबवेवाडी, पुणे) यांना पोलिसांनी यांना अटक केली. तर १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. तर याप्रकरणी फरार असलेल्या विकास आत्माराम शिर्के, मंगेश रमेश हांडे यांचा बिबवेवाडी पोलीस शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी मधील भाजपच्या विद्यमान नगरसेविका वर्षा भीमराव साठे यांचे बिबवेवाडी येथे अप्पर इंदिरा नगरमधील पवननगर परिसरात सर्वे नंबर 648, येथे जनसंपर्क कार्यालय आहे. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास कार्यकर्ते नितीन साठे, सुरज आंब्रे, अण्णा उघडे, दीपक धडे हे जनसंपर्क कार्यालयात होते.

दरम्यान त्यांच्या ओळखीचे अप्पर भागात राहणारे विकास शेळके, बसवेश्वर ख्याले, मंगेश हांडे, किरण जाधव यांनी जनसंपर्क कार्यालयात आले. त्यांनी कार्यकर्त्याँना तुमचे साहेब कुठे आहेत? त्यांचा नंबर द्या असे म्हणून टेबलावरील काचा फोडून कार्यकर्त्यांना मारहाण केली. बसवेश्वर ख्याले याने माझ्याकडे पाहत नाहीत असे म्हणून तुमच्याकडे बघून घेतो अशी धमकी दिली.

त्यानंतर पुन्हा सायंकाळी साडेचार सुमारास धारदार हत्यार घेऊन फिर्यादी यांना भीती दाखवण्याच्या उद्देशाने त्याच्या एका साथीदारासह त्याने जनसंपर्क कार्यालयाचा दरवाजा ठोठावून फिर्यादी यांना धारदार हत्याराची भीती दाखवून दुचाकीवरून निघून गेले.

याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवून बसवेश्वर ख्याले, किरण जाधव, आदित्य बनकर यांना परिसरात अटक केली. गुन्ह्यातील फरार आरोपी विकास शिर्के, महेश हांडे यांचा पोलिस शोध घेत आहे.

सदरची कामगिरी अतिरिक्त कार्यभार पोलीस निरीक्षक गुन्हेशाखा हडपसर एस.एस.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे यांच्या सूचनेप्रमाणे बिबवेवाडी पोलीस हवालदार रवी चिप्पा, अमित पुजारी, खंडाळे, रोहित शिंदे, पोलीस शिपाई राघव रुपनर, स्मित चव्हाण यांनी केली.

आरोग्य विषयक वृत्त – 

यकृत निरोगी राहण्यासाठी महत्वाच्या टिप्स

किमोथेरपी म्हणजे काय ? ती कर्करुग्णांसाठी वरदान ठरते का ?

रूग्णांना सुरक्षित रक्त मिळतेय का ?आधुनिक तपासणी गरजेची

प्राण्यांसाठी हव्यात ‘रक्तपेढ्या’

You might also like