निफाड पं. स. उपसभापती शिवा सुरासे यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते उद्घाटन

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री नामदार दादा भुसे यांच्या हस्ते शिवसेनेचे निफाड पंचायत समितीचे उपसभापती शिवा पाटील सुरासे यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालय या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब क्षिरसागर, शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम, माजी आमदार कल्याणराव पाटील, शिवसेनेचे नेते उदय सांगळे उपस्थित होते.

यावेळी परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या त्या ठिकाणी कृषी मंत्री महोदयांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांना मागील वर्षी बँकांनी कपात केलेले पीक विम्याचे नुकसान भरपाई मिळावी, शेतकऱ्यांचा कर्जमाफी मध्ये समावेश करण्यात यावा, खते दुकानदार यांना युरिया बरोबर इतर औषधे घेण्याची सक्ती थांबवावी, गट शेतीच्या थांबलेला अनुदान मिळावे अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शिवसेना महिला आघाडीच्या वतीने बचत गटाच्या ग्रह उद्योगांना जास्तीचे अनुदान उपलब्ध करून द्यावे ओझरखेड कालव्याचे रुंदीकरण करावे अशा विविध मागण्या याप्रसंगी शेतकऱ्यांनी मांडल्या.

याप्रसंगी सरपंच ललिता गांगुर्डे, सरपंच कल्पना वाघ उत्तम वाघ ,भास्कर खुर्दे ,डॉ. विजय केंगे ,बंडू शिंदे, शंकर शिंदे, रवी पाचोरकर ,संतोष बोराडे, रमेश आहेर, रामनाथ सुरासे ,अशोक सुराशे, दत्ता मापारी, भगवान बोराडे, मोहन लोखंडे, सोमनाथ गांगुर्डे, शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख सुरेखा अहिरे ,शहर प्रमुख कविता जाधव, ज्योती सुराशे, ज्योती जाधव, पुष्पा भवर, हिरा सोनवणे, केशव जाधव ,बापू मोकाटे, वैभव शिंदे ,सचिन सुरासे, मोहन सुराशे, तेजस गीते, सुमंत कारवार, बाळासाहेब शिरसाठ आधीचे नागरिक व महिला उपस्थित होते