संतापजनक ! कार्यालयातील लेडीज ‘चेंजिंग रूम’ध्ये महिला कपडे बदलतानाचे मोबाईलमध्ये ‘शुटींग’ करणारा युवक ‘गोत्यात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महिलांच्या चेंजिंग रुममध्ये कोणालाही दिसणार नाही अशा पद्धतीने मोबाईलच्या कॅमेऱ्यात महिला कपडे बदलत असतानाचे चित्रिकरण केल्याच धक्कादायक प्रकार मुंबईतील एका कंनपीच्या कार्यालयात समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कंपनीतील एका हाऊस किपींगचे काम करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे.

गणेश नदागे असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

गणेश हा मरोळ परिसरातील एका खासगी कंपनीत नोकरी करतो. तो तेथे हाऊसकिपिंगचे काम करतो. त्याने कुणालाही समजणार नाही याप्रकारे महिलांच्या चेंजींग रुममध्ये मोबाईल लपवून ठेवला होता. त्यात तो महिला कपडे बदलतानाचे चित्रिकरण करत होता.

असा आला प्रकार समोर
मंगळवारी एक महिला कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रुममध्ये गेली होती. त्यावेळी तिच्या नजरेस हा मोबाईल पडला. कोणीतरी मोबाईल विसरून गेलं असेल असं तिला वाटलं. त्यामुळे तिने तो मोबाईल मॅनेजरकडे देण्यासाठी हातात घेतला. त्यावेळी मोबाईलचा कॅमेरा सुरु असल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिने मोबाईलच्या गॅलरीमध्ये तपासले तेव्हा त्यात महिलेचे कपडे बदलतानाचे चित्रिकरण दिसले. त्यानंतर तिने याची माहिती कंनपीच्या मॅनेजरला दिली. मॅनेजरने गांभीर्य ओळखून तात्काळ सहार पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेव्हा पोलिसांनी चौकशी केल्यावर कोणीही मोबाईल घेण्यासाठी पुढे येत नव्हते. त्यावेळी सीम कार्ड व मोबाईल क्रमांक यांची पडताळणी केली. तेव्हा तो मोबाईल गणेशचा असल्याचे समोर आले. पोलीस आल्याचे समजल्यावर त्याने तेथून पळ काढला. त्यानंतर त्याला अंधेरी परिसरातून पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.