प्रशासनाचे दुर्लक्ष, सुपे येथील नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा प्रयत्न

सुपे खुर्द : पोलीसनामा ऑनलाईन – गट नंबर 717 व 718 या वेशीच्या ओढ्यामधील स्मशानभूमी ते जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागील ओढाचा भाग बदलून दुसर्‍याच दिशेने पाण्याचा प्रवाह नेण्याचा घाट उद्योजक विशाल छुबेरा यांनी केला आहे. हा ओढा बुजवून दिशा बदलल्यामुळे ईनामकेमळा व सुपे येथील इतर शेतकऱ्यांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागेल व एखादी अनुचित घटना घडेल या आधीच आपण संबंधित उद्योजक विशाल छुबेरा यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून संबंधित मिळकत ही सरकार जमा करून घ्यावी. अशी लेखी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष डुबल यांनी तहसीलदार व उपविभागीय आधिकारी दौड पुरंदर यांच्याकडे केली आहे.

यापूर्वी देखील छुबेरा यांनी अशाच प्रकारचा उद्योग याच गटात केलेला असून याची सुनावणी सुरू आहे. यापूर्वी मंडल अधिकारी यांनी वेळोवेळी पंचनामे केलेले आहेत व ते पंचनामे तहसील कार्यालयाकडे उपलब्ध आहेत. संबंधित व्यक्ती ही सुट्टीच्या दिवशी अशा प्रकारचे उद्योग करीत असल्याचे वारंवार आमच्या निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे आपण त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून सदरची मिळकत ही सरकार जमा करून घ्यावी.

आपण असे न केल्यास आपल्याविरुद्ध आपल्या कार्यालया समोर आम्ही आठ दिवसांमध्ये आंदोलन किंवा उपोषण याचा मार्ग अवलंबणार आहे. असे निवेदनात म्हटले आहे.

 

Visit :- policenama.com