४००० रुपयांची लाच घेताना इंदापूरच्या भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ४ हजार रुपयांची लाच घेताना इंदापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील परिरक्षक भूमापक अधिकाऱ्याला अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले. वारस नोंद करण्यासाठी व नावात बदल करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तडजोडीअंती ४ हजार रुपये स्विकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले.

याप्रकरणी ५० वर्षीय व्यक्तीने तक्रार केली होती. तर सतिश अर्जुन गायकवाड (वय ४९, परीरक्षक भूमापक अधिकारी, भूमी अभिलेख ईंदापुर कार्यालय रा . ४१/३८९, न्यू बुधवार पेठ, सोलापुर) असे पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

तक्रारदार यांची यांनी त्यांची वारस नोंद होण्यासाठी व नावात बदल करण्यासाठी भूमी अभिलेखच्या इंदापूर येथील उपअधिक्षक कार्यालयात अर्ज केला होता. त्यावरून परिरक्षक भूमापक सतिश गायकवाड यांनी तक्रारदार यांना ५ हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदार पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली. शनिवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने याची पडताळणी केली तेव्हा सतिश गायकवाड यांनी तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांची लाच मागत तडजोडीअंती ४ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. सतिश गायकवाड याला ४ हजार रुपयांची लाच घेताना इंदापरूच्या भूमी अभिलेख कार्यालयात रंगेहात पकडण्यात आले.

एखाद्या लोकसेवकाने लाचेची मागणी करताच त्याची तक्रार अँटी करप्शनच्या १०६५ या क्रमांकावर करावी असे आवाहन अँटी करप्शनच्या वतीने करण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like