नवीन कॅबिनेट सचिव गाबा हे 22 व्या वर्षी बनले होते IAS, कलम 370 हटवण्यात ‘क्रीम’ रोल !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – केंद्रीय गृहसचिव राजीव गौबा यांची नवे कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते आता प्रदीपकुमार सिन्हा यांची जागा घेतील. हे पद देशाच्या नागरी सेवेतील सर्वात शक्तिशाली मानले जाते. पीएम मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (AAC ) कॅबिनेट सचिव पदावर त्याची नियुक्ती करण्यास मान्यता दिली.

गौबा हे कॅबिनेट सचिव होण्यापूर्वी केंद्रीय ग्रह सचिव म्हणून कार्यरत होते. ते १८८२ च्या तुकडीचे आयएएस अधीकारी आहेत. याआधी ते केंद्रीय शहरी विकास मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत होते. आता ते केंद्रीय सचिवालय सांभाळणार आहेत.

३७० हटवण्यात होती महत्वाची भूमिका
ग्रह सचिव असताना राजीव गौबा यांनी काश्मीर मधून कलम ३७० हटवण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. ग्रहमंत्री अमित शाह यांच्यासोबत याबाबतचे नियोजन करण्यात ते सामील होते. ३७० हे कलम हटवण्याचा धाडशी निर्णय घेण्यापूर्वी ते काश्मीर परिसरात तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष जाऊन आले होते.

येत्या ३० ऑगस्ट पासून ते पदभार स्वीकारतील आणि पुढचे २ वर्षे कॅबिनेट सचिव म्हणून कार्यरत राहतील. गौबा यांच्या आधी पी.के.सिंह हे गेल्या ४ वर्षांपासून कॅबिनेट सचिवपदी कार्यरत होते.

गौबा केंद्रात एप्रिल २०१६ साली प्रतिनियुक्तीवर येण्यापूर्वी ते झारखंड मध्ये मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी कामगार सुधारणांच्या दिशेने केलेले काम नक्षलवाद्यांची कंबर मोडणारे होते. कामगारांना हक्क प्रदान करण्यासोबतच कारखान्यांना सुरक्षा पुरविण्यातही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. पूर्वीच्या तुलनेत आता नक्षलवादाच्या घटनांमध्येही कमालीची घट झाली आहे. राजीव गौबा यांचा जन्म १५ ऑगस्ट १९५९ रोजी पंजाबमध्ये झाला होता. ३१ ऑगस्ट २०१७ रोजी त्यांनी केंद्रीय गृहसचिवपदाचा कार्यभार स्वीकारला होता.

राजीव गौबा यांनी यापूर्वी भारत सरकारच्या गृह, संरक्षण, पर्यावरण, वन आणि इलेक्ट्रॉनिक्स तसेच माहिती तंत्रज्ञान मंत्रालयात काम केले आहे. गौबा यांनी झारखंड सरकारचे मुख्य सचिव म्हणूनही काम पहिले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या जागतिक संस्थेमध्येही त्यांनी ४ वर्षे भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

राजीव गोबा यांचे प्राथमिक शिक्षण झारखंड मधील रांची या शहरामध्ये झाले आहे. त्यानंतर त्यांनी पटना विश्वविद्यालयातून भौतिकशाश्त्र विषयात पदवी प्राप्त केली. ते १९८२ च्या झारखंड केडरचे भारतीय प्रशासकीय सेवेतील आयएएस अधिकारी आहेत.

याशिवाय , अजय कुमार यांना नवे रक्षा सचिव म्हणून नियुक्त केले आहे. ते संजय मित्रा यांचे स्थान ग्रहण करतील. ज्यांचा येत्या २३ ऑगस्टला कार्यकाळ संपूष्टात येत आहे. तसेच संरक्षण मंत्रालयात नवीन सचिव (संरक्षण उत्पादन) म्हणून आयएएस अधिकारी सुभाष चंद्र यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते संरक्षण विभागात विशेष सचिव म्हणून कार्यरत आहेत.

तर जाणून घेऊयात कॅबिनेट सचिवालय काय असते आणि ते कसे काम करते.
भारत सरकार (कामकाजाचे वाटप) नियम १९६१ , च्या तरतुदीनुसार कॅबिनेट सचिवालय थेट पंतप्रधानांच्या अधिपत्याखाली काम असते. त्याचे प्रशासकीय प्रमुख कॅबिनेट सचिव हे असतात. केंद्रीय सचिवालय कॅबिनेट समित्यांना सहकार्य करत असते. कॅबिनेट सचिव हे नागरी सेवेचे प्रमुख असतात. त्यामुळेच विविध मंत्रालयांमध्ये समन्वय वाढवण्यासाठी कॅबिनेट सचिवालय महत्वाची भूमिका बजावत असते.

कॅबिनेट सचिवालय हे प्रत्येक महिन्याला एक अहवाल करून अध्यक्ष, उपराष्ट्रपती तसेच सर्व मंत्रालये / मंत्री आणि विभागांच्या प्रमुख कामांची माहिती देत असते. तसेच विभागांच्या कामकाजाविषयी अवगत करत असते. देशातील उद्भवणाऱ्या कोणत्याही मोठ्या संकटाच्या काळात त्याचे व्यवस्थापन करणे आणि अशा परिस्थितीत विविध मंत्रालयांच्या कामकाजाचे समन्वय साधणे हे देखील कॅबिनेट सचिवालयाचे एक कार्य आहे.