उस्मानाबाद : ‘त्या’ अधिकाऱ्याचे भ्रमणध्वनीवर ‘वाभाडे’ !

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – सबंध महाराष्ट्र मानवतेच्या भावनेतून पूरग्रस्तांना मदत करत असताना उस्मानाबाद मध्ये वेगळेच घडत आहे. त्यामुळे जिल्हाभर संतापाची लाट उसळली आहे. आपल्या गैरकारभारासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘महावितरणच्या ‘एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने उद्योजक व व्यापाऱ्यांना ‘धमकी’ सत्र सुरू केले आहे. उस्मानाबाद शहरांमधील काही सामाजिक संघटना, विविध क्षेत्रातील तरूण, व्यापाऱ्यांच्या संघटना यांनी पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे ‘नियोजनबद्ध ‘व मोठ्या प्रमाणावर काम चालू केलेले आहे.

याद्वारे जमा करण्यात आलेले साहित्य आपल्या जिल्ह्यातील लोकांना आपले नाव सांगून हे साहित्य वाटप करावे असा आग्रह हा अधिकारी गेली काही दिवस करत होता. पण ही मंडळी जुमानत नाहीत हे लक्षात आल्यावर त्याने या उपक्रमात सहभागी असलेल्या व्यापाऱ्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना धमकी देणे सुरू केले. याचा या संघटनेच्या जिल्हाभरातील सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. एवढेच नव्हे तर या कामात सहभागी असलेल्या एका तरुण नेत्याने या अधिकाऱ्याचे भ्रमणध्वनीवर ‘वाभाडे ‘काढल्याचे समजते. अशा अधिकाऱ्याचा शासनाने योग्य बंदोबस्त करावा अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून व्यक्त केली जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like