रेल्वे सेवेत निवड झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे पुरंदर तालुक्‍यातील जिल्हा परिषदच्या शाळेला भेट

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – भारतीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून रेल्वेसेवेत निवड झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुरंदर तालुक्यातील कदमवस्ती येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी शैक्षणिक संवाद साधला . विद्यार्थ्यांची बौद्धिक प्रगती पाहून उद्याचे हे अधिकारी तब्बल दोन तास रमले होते.

भारतीय लोकसेवा आयोगाची रेल्वे सेवेची परीक्षा पास झाल्यानंतर प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या ३२ प्रशिक्षणार्थी ग्रामीण भागातील मूलभूत सुविधाचा अभ्यास करण्यासाठी पुरंदर तालुक्याचा दौरा केला . पुरंदर चे गटशिक्षणाधिकारी रामदास वालझाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्याच्या या अधिकाऱ्यांनी पुरंदरचे बाल विकास अधिकारी धनराज गिराम यांच्यासह पुरंदरचा दौरा केला.

साकुर्डे येथील कदमवस्ती येथील प्राथमिक शाळेत जाऊन त्यांनी शैक्षणिक सुविधांची माहिती घेतली. या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे इंग्रजी वाचन, लेखन, संभाषण कौशल्य, संगणक शिक्षण, हस्ताक्षर, गणिती क्रिया,  कृतीयुक्त अध्यापन पद्धती समजावून घेतल्या, विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमोर सांस्कृतिक कार्यक्रम ही सादर केले. ग्रामीण भागातील मराठी शाळांतून घडणाऱ्या नवीन पिढीची प्रगल्भता, आकलन क्षमता पाहून सर्वजण भारावून गेले होते. नव्याने अधिकारी होऊ पाहणारे हे प्रशिक्षणार्थी या शाळेत एवढे रमले की, त्यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाबरोबर शाळेला साडे सहा हजार रुपयांची देणगी ही देऊन टाकली.

प्रशिक्षणार्थी अधिकारी के वामसी कृष्णा रेडडी, सीमा श्रोतीय, परविंद सिंग, जय करण यादव, शुभम शर्मा, अंकुश अगरवाल यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात आपले वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व निर्माण केले पाहिजे, त्याच बरोबर स्वत:चे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी विविध खेळात रुची ठेवली पाहिजे. जिल्हा परिषदेच्या शाळांतून इतके उत्कृष्ट शिक्षण मिळते याबद्दल ही त्यांनी आश्चर्य व्यक्त करून या शाळेतच शिक्षण घ्यावे असे आवाहन ही केले आहे. शाळेतील आदर्श शिक्षक अनंता जाधव, व सरेखा जाधव यांचा ही त्यांनी विशेष गौरव केला.

यावेळी लोकमत चे पत्रकार बी एम काळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ईश्वर कदम, पालक श्रीकांत कदम, हनुमंत कदम, लहू कदम, सतीश कदम, अक्षय कदम, आदी उपस्थित होते. स्वागत केंद्रप्रमुख अनिल जगदाळे यांनी केले, शाळेबद्दलची माहिती मुख्याध्यापक अनंता जाधव यांनी दिली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?