राहुल द्रविडला दिली BCCI ने मोठी जबाबदारी, ‘या’ संस्थेच्या प्रमुखपदी निवड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा माजी फलंदाज आणि अंडर-१९ संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड याची बीसीसीआयने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी निवड केली आहे. या अकादमीत युवा खेळाडूंना घडवण्याचे काम राहुल द्रविड करणार आहे. सोमवारी बीसीसीआयने एका पत्रकाद्वारे हि माहिती दिली.

बीसीआयने जारी केलेल्या या पत्रकात म्हटले आहे कि, राहुल द्रविड याला बेंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी राहुल द्रविड सर्व खेळाडूंना प्रशिक्षण आणि प्रशिक्षकांना त्याचबरोबर सपोर्ट स्टाफला प्रशिक्षण, मेन्टॉरिंग आणि ट्रेनिंग देण्याचे काम करेल.
याचबरोबर राहुल द्रविड भारतीय पुरुष आणि महिला संघाना देखील मार्गदर्शन करणार आहे. त्याचबरोबर इंडिया-ए, अंडर-१९, अंडर-२३ या संघांच्या प्रशिक्षकांबरोबर काम करणार आहे.

बऱ्याच काळापासून राहुल द्रविड याची या जागी नेमणूक होणार असल्याची चर्चा होती. अखेर बीसीसीआयने अधीकृतपणे राहुल द्रविड याची या जागेवर नेमणूक केली आहे. २०१६ पासून राहुल द्रविड अंडर-१९ संघाचा प्रशिक्षक आहे. त्याच्या प्रशिक्षणाखाली भारताच्या अंडर-१९ संघाने दोन वेळा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर २०१८ मध्ये अंडर -१९ संघाने वर्ल्डकप देखील जिंकला होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली अनेक भारतीय खेळाडू तयार झाले असून खूप खेळाडू सध्या भारतीय संघात उत्तम कामगिरी करत आहेत.

द्रविडच्या नेतृत्वात तयार झालेलं खेळाडू

मयांक अग्रवाल
कुलदीप यादव
श्रेयस अय्यर
पृथ्वी शॉ
ऋषभ पंत

डायबिटीज, सर्दी, ताप, कावीळ या आजारांवर भेंडी आहे गुणकारी

औषध न घेताही नियंत्रणात ठेवू शकता कोलेस्टेरॉल, हे आहेत ५ उपाय

केवळ पौष्टिकच नाही तर औषधीही आहे ‘उडीद डाळ’ ; जाणून घ्या फायदे

सेक्सलाईफमध्ये आनंद मिळवण्यासाठी घ्या ‘हा’ आहार

उपचाराबाबत निष्काळजीपणा केला तर ‘डॉक्टरांवर’ होणार कारवाई