पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी ‘महाविकास’चे अधिकृत उमेदवार जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणूक आयोगाने राज्यात एकूण पाच जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. यात 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांच्या जागा असून, त्यासाठी येत्या 1 डिसेंबर रोजी होणार आहे. औरंगाबाद, पुणे, नागपूर विभागाच्या पदवीधर मतदारसंघाची, तर अमरावती आणि पुणे विभागाच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे. निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत. आघाडीच्या नेत्यांनी संयुक्तपणे प्रसिद्धिपत्रक (Official candidate announced by Mahavikas front for Graduate and Teacher Constituency of Legislative Council) जारी करत उमेदवारांची नावे जाहीर केले आहेत.

प्रसिद्धिपत्रकात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे नेते सुभाष देसाई आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आदींनी केले आहे. येत्या 3 डिसेंबरला निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहे.

महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांची यादी :
1) अमरावती शिक्षक मतदारसंघ – श्रीकांत देशपांडे (शिवसेना)
2) पुणे शिक्षक मतदारसंघ – जयंत आसगावकर (काँग्रेस)
3) पुणे पदवीधर मतदारसंघ – अरुण लाड (राष्ट्रवादी काँग्रेस)
4) औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ – सतीश चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस)
5) नागपूर पदवीधर मतदारसंघ – अभिजित वंजारी (काँग्रेस)

अशा होतील लढती…
– नागपूर पदवीधर मतदारसंघातील लढत
अभिजित वंजारी (काँग्रेस), संदीप जोशी (भाजप), राहुल वानखेडे (वंचित), नितीन रोंघे (विदर्भवादी उमेदवार) यांच्यात होणार लढत.

– औरंगाबादमध्ये पदवीधर मतदारसंघातील लढत
शिरीष बोराळकर (भाजप), प्रवीण घुगे (भाजप बंडखोर), रमेश पोकळे (भाजप बंडखोर), नागोराव पांचाळ (वंचित), सतीश चव्हाण (राष्ट्रवादी), ईश्वर मुंडे (राष्ट्रवादी) यांच्यात रंगणार लढत.
– अमरावती शिक्षक पदवीधर मतदारसंघातील लढत
श्रीकांत देशपांडे (शिवसेना), नितीन धांडे, दिलीप निंभोरकर (शिक्षक भारती), संगीता शिंदे (शिक्षण संघर्ष समिती) , प्रकाश काळबांडे (विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ) यांच्यात होणार लढत.
– पुणे शिक्षक मतदारसंघातील लढत
जयंत आसगावकर (काँग्रेस) विरुद्ध उत्तम पवार (पदवीधर कल्याण मंडळ)