Coronavirus : धक्कादायक ! मुंबईतील ‘फिल्ड’वरील काही पत्रकारांची ‘कोरोना’ टेस्ट ‘पॉझिटिव्ह’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं राज्यात सर्वत्र थैमान घातलं आहे. त्यामधूनही मुंबई आणि पुण्यात कोरोनाचा हौदोस चालू आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आताच एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एएनआयला मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील फिल्डवरील काही पत्रकारांची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्याबाबत एएनआयला सुत्रांनी माहिती दिली आहे.

मुंबई आणि पुणे ही दोन शहरे कोरोनाची हॉटस्पॉट आहेत. मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 2 हजारपेक्षा अधिक आहे तर पुणे विभागातील संख्या ही 600 पेक्षा जास्त झाली आहे. मुंबईत 100 हून अधिक अन् पुण्यात 50 हून अधिक जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आपला जीव धोक्यात घालून वार्तांकन करीत आहेत. त्यामध्येही मुंबईतील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. मुंबई शहरात वार्तांकन करणार्‍या म्हणजेच फिल्डवर (कार्यालये, हॉस्पीटल आणि इतर ठिकाणी जावून माहिती घेणारे) जाणार्‍या काही पत्रकारांची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. अधिक माहिती लवकरच समोर येईल. नेमक्या किती पत्रकारांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी मध्यप्रदेशातील एका पत्रकाराला कोरोनाची लागण झाल्याची महिती समोर आली होती. एवढेच नव्हे तर तो पत्रकार मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला देखील उपस्थित राहिल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्या पत्रकारावर उपचार करण्यात आले होते.