आणखी एक ‘ठाकरे’ राजकारणात ‘अ‍ॅक्टिव्ह’, अमित ठाकरेंची मनसेच्या नेतेपदी निवड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज मनसे कार्यकर्त्यांचे अधिवेशन मुंबईत पार पडले. यावेळी पक्षाचा झेंडा लॉन्च करण्यात आला. त्यानंतर सर्वांना उत्सुकता होती की अमित राज ठाकरे यांचे लॉन्चिंग होणार का? या अधिवेशनात मनसेकडून त्यांचे लॉन्चिंग करण्यात आले असून आता अमित ठाकरेंची मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे.

अमित ठाकरेंची मनसेच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर आता ते अधिकृतरित्या राजकारणात दिसतील. अमित ठाकरेंचा राजकारणात अधिकृत प्रवेश झाल्यानंतर मनसैनिकांकडून अमित ठाकरे ‘तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’ च्या घोषणा देण्यात आल्या.

अमित ठाकरेंनी तब्बल 27 वर्षांनी पहिल्यांदा व्यासपीठावर इतक्या मोठ्या संख्येने जमलेल्या मनसैनिकांमध्ये मंचावरुन भाषण केलं. यावेळी त्यांनी सर्वांचे आभार मानत त्यांनी मनसेचा ठराव मांडला. यावेळी बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, मला रात्री कळालं की मला मनसेचा ठराव मांडायचा आहे. यानंतर त्यांनी शिक्षणाचा ठराव मांडला. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी होणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.

ठराव मांडल्यानंतर मनसे विद्यार्थी सेनेकडून अमित ठाकरेंचे शाल आणि तलवार देऊन सत्कार करण्यात आला. अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या आजी, आई शर्मिला ठाकरे, पत्नी मिताली भावूक झाल्याचे दिसले. त्यानंतर अमित ठाकरेंनी आपल्या वडीलांची राज ठाकरेंची भेट घेतली.

फेसबुक पेज लाईक करा –