काय सांगता ! होय, ‘नित्यानंद’विरूध्दच्या अपहरण प्रकरणाचा तपास करणार्‍या अधिकार्‍यांनीच मुलांना दाखवलं ‘पॉर्न’

अहमदाबाद : वृत्तसंस्था – स्वयंघोषित बाबा स्वामी नित्यानंदविरूद्ध अपहरण प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान नित्यानंदच्या आश्रमातील मुलांना अश्लील व्हिडिओ दाखविल्याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

विशेष कोर्टाच्या आदेशानुसार 6 मार्च रोजी ज्या 14 जणांविरूद्ध एफआयआर नोंदविण्यात आला होता त्यात बाल कल्याण समितीच्या (सीडब्ल्यूसी) सदस्यांचा समावेश आहे. नित्यानंदचे अनुयायी गिरीश तुर्लापती यांच्या वतीने दाखल केलेल्या तक्रारीवर सुनावणी करताना कोर्टाने हे प्रकरण नोंदविण्याचे आदेश दिले. तुर्लापती अहमदाबादच्या बाहेरील हिरापूर गावात आश्रमाच्या गुरुकुलमध्ये राहतात.

अहमदाबाद जिल्ह्यातील विवेकानंदनगर पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हेच तेच पोलिस स्टेशन आहे ज्यात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये वादग्रस्त स्वयंघोषित बाबा नित्यानंद विरोधात तीन मुलांचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तुर्लापती यांनी आपल्या अर्जामध्ये असा आरोप केला आहे की, विवेकानंदनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक आरबी राणा यांच्यासह पोलिस अधिकारी आणि सीडब्ल्यूसीच्या सदस्यांनी आश्रमातील अल्पवयीन मुलांवर आक्षेपार्ह प्रश्न उपस्थित केले आहेत. तपासकर्त्यांनी मुलांवर मानसिक अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे.

मुलींसह मुलांनाही अश्लील व्हिडिओ आणि विनयभंगाचे व्हिडिओ आणि फोटो तपास पथकांनी दाखवल्याचा आरोपही तुर्लापती यांनी केला आहे. तुर्लापती यांनी असा दावा केला की पोलिस अधिकारी आणि संबंधित सीडब्ल्यूसीच्या सदस्यांनी मुलांकडून अनुकूल विधाने काढण्यासाठी भावनिक ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला.

विशेष पोक्सो लॉ कोर्टाने आपल्या आदेशानुसार पोक्सो कायदा, भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले. पोलिस निरीक्षक राणा, उपअधीक्षक के.टी. कामरिया, उपअधीक्षक रियाझ सरवैया, उपअधीक्षक एस.एच. शारदा, जिल्हा बाल सुरक्षा अधिकारी दिलीप मीर आणि सीडब्ल्यूसी अध्यक्ष भावेश पटेल यांच्यासह सी.डब्ल्यू.सी. चे सदस्य आरोपी आहेत.

अहमदाबाद ग्रामीण एससी / एसटी सेलचे पोलिस उपाधीक्षक पीडी मनवर म्हणाले की, ‘आम्ही पोक्सो कोर्टाच्या आदेशानंतर पोलिस अधिकाऱ्यांसह 14 जणांविरूद्ध 6 मार्च रोजी एफआयआर नोंदविला. आतापर्यंत आम्ही फिर्यादीचे निवेदन नोंदविले असून पुढील तपास सुरू आहे.’